शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरच्या शिक्षिकेच्या गणित पेटीने पटकावला बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सावंगी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनीता लहाने यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या कृतीतून गणित पेटीला हा बहुमान मिळून दिला. सुनीता लहाने यांनी गणितासारखा कठीण विषय गणित पेटीच्या मदतीने आपल्या व्हिडीओंच्या माध्यमातून सोपा करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला. त्यांनी याकरिता स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी एकूण ४९ व्हिडीओ बनविलेत.

लोकमत’च्या चित्रफितीची दखल : कोरोनाच्या संकटकाळात राबविला उपक्रम, गुरुपौर्णिमेला राज्यातील दहा शिक्षकांचा गौरवपरतवाडा : लॉकडाऊनच्या काळात तंत्रस्रेही शिक्षण देणाऱ्या राज्यातील १० शिक्षकांवरलोकमत’ने तयार केलेल्या चित्रफितीची दखल गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईला घेतली गेली. या १० शिक्षकांना गुरूपौर्णिमेलाच सन्मानपत्र, ११ हजार रुपये रोख व गिफ्ट हॅम्पर देऊन गौरविण्यात आले.यात अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सावंगी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनीता लहाने यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या कृतीतून गणित पेटीला हा बहुमान मिळून दिला. सुनीता लहाने यांनी गणितासारखा कठीण विषय गणित पेटीच्या मदतीने आपल्या व्हिडीओंच्या माध्यमातून सोपा करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला. त्यांनी याकरिता स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी एकूण ४९ व्हिडीओ बनविलेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, ३ पैसे, ५ पैसे, १० पैसे, २० पैसे या जुन्या नाण्यांच्या मदतीने लहाने यांनी नाण्यांचे नोटांत आणि नोटांचे नाण्यांमध्ये रुपांतर विद्यार्थ्यांपुढे मांडले. कोविडच्या भीतीयुक्त वातावरणातून बाहेर पडून शिक्षकांकरिता बनविलेले हे व्हीडीओ पालकांसह विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात उपक्रमशील, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळेवर कार्यरत, तंत्रस्रेही शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमाची ‘लोकमत’ने दखल घेतली.यात राज्यातील निवडक लक्षवेधक उपक्रमांवर 'लोकमत'चे पत्रकार अतुल कुळकर्णी यांनी एक चित्रफीत तयार केली. वा...। क्या बात है गुरूजी।। या शीषर्काखालील ही चित्रफीत राज्यभर पाहिली जात आहे.यात ही चित्रफीत काही बड्या कंपन्यांच्या संचालकांपर्यंत पोहचली. ५ जुलैला संचालकांनी दहाही शिक्षकांसमवेत बैठक घेतली. त्यांना पुरस्कृत केले. यात रणजीतसिंह डिसले (परितेवाडी, सोलापूर), सविता बोरसे (नाशिक), बालाजी जाधव (विजयनगर, सातारा), मृणाल गांजले (पिंपळगाव म्हाळुंगे, पुणे), शमशुद्दीन अत्तार (शिरगाव, सिंधुदुर्ग), सुनील अलुरकर (हिंगणी, नांदेड), अमोल हंकारे (खोत, सांगली), मानाजी माने (सोलापूर), सुनीता लहाने (अचलपूर अमरावती) यांचा समावेश आहे.ऑनलाईन शिक्षण हा पर्याय नाही. ही पुरवणी आहे. गणितात गणित पेटीचे महत्व अधिक आहे. शासनाकडून शाळांना मोफत उपलब्ध करून दिलेली गणित पेटी म्हणजे गणिताची प्रयोगशाळाच आहे. गणितातील लहानमोठ्या संकल्पना स्पष्ट करण्याकरिता गणित पेटी अधिक उपयोगी आहे.- सुनीता लहाने, विषय सहायक, अमरावती

टॅग्स :Teacherशिक्षकLokmatलोकमत