गुप्त माहितीच्या आधारे चांदूर बाजार नाका येथे दोन इसम विनानंबर काळ्या रंगाच्या दुचाकीवर अवैधरीत्या देशी दारूच्या पावट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने गुरुवारी जात होते. दारूच्या पावट्या प्लास्टिकच्या पांढऱ्या पुतळीत गाडीवर ठेवून उभे आहे. पंच व स्टाफसह सापळा रचून त्यांना पकडण्यात आले. विनोद शामराव बोस्कर (३५, रा. शिराळा व संतोष किसनराव घुगुलमाने (२८, रा. शिराळा व त्यांच्या दुचाकीवर ठेवलेल्या पुतळीची झडती घेतली असता, त्यात देशी दारू ९० एम.एल.च्या १९० पावट्या ९,५०० रुपये व दुचाकी ५० हजार रुपये असा एकूण ५९,५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अबदागिरे व अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉडचे पोउपनी राजेश भालेराव पोहेकॉ पुरुषोत्तम बावणेर, पोका विशाल थोरात यांनी केली. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेश भालेराव करीत आहे.
080721\168-img-20210708-wa0068.jpg
अचलपुर पोलिसांनी पकडली अवैद्य दारू