शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अचलपूर पंचायत समितीमध्ये भरला बाजारहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

फोटो कॅप्शन - बाजारहाटची पाहणी करताना मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल जयंत बाबरे व अधिकारी परतवाडा : ग्रामीण भागातील महिला ...

फोटो कॅप्शन - बाजारहाटची पाहणी करताना मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल जयंत बाबरे व अधिकारी

परतवाडा : ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याच्या विक्रीसाठी दालान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. महिलांच्या अडचणी शासनाच्यावतीने दूर करणार असल्याचे मत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी व्यक्त केले. ते अचलपूर पंचायत समितीमध्ये शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बाजारहाटच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

गटविकास अधिकारी जयंत बाबरे, गटविकास अधिकारी महादेव कासदेकर, स्वीय सहायक छोटू तेलगोटे, पंचायत समिती सदस्य सुनील तायडे, जिल्हा व्यवस्थापक शीतल गर्गीलवर, तालुका अभियान व्यवस्थापक कृष्णा ठाकरे, उमेद चमू विकास खंडेजोड, प्रकाश गिऱ्हे, अभिषेक वानखडे, अंकुश भिरकड, अर्पित चव्हाण आदी उपस्थित होते. अचलपूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत महिला स्वयंसाहाय्यता समूहाच्या समूह कोल्हा, वैष्णोदेवी समूह सावळापुर, जागृती समूह कांडली, हिरकणी समूह कंडली, श्रमसफल्या समूह कांडली, राधाकृष्ण समूह कांडली , आधार समूह देवमाळी, जय भोले देवामाळी, इत्यादी महिला समूहाने त्यांची उत्पादने विक्रीकरिता बाजारहाटमध्ये आणली होती.

बॉक्स

११५०० ची विक्री

ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला भाजीपाला, मूग, ज्वारी, विविध चटण्या, पापड, कुरड्या, लोणचे, शेवळ्या, शोभेच्या वस्तू, रानभाज्या आदी विविध साहित्य बाजारहाटमध्ये विक्रीसाठी आणले होते. जवळपास ११५०० रुपयांची विक्री बाजारातून झाली. तालुक्यात एकूण १७५० स्वयंसाहाय्यता बचत गट असून, त्यापैकी जवळपास ८० बचत गट विविध उत्पादने तयार करीत आहेत.

बॉक्स

प्रत्येक गुरुवारी भरणार बाजारहाट

परतवाडा शहरात गुरुवारचा आठवडी बाजार असतो. त्याचप्रमाणे आता पंचायत समिती आवारात महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेपर्यंत विविध उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. पंचायत समिती येथे १५ ऑगस्ट रोजी तालुका विक्री स्टॉल उघडण्यात आले असून, बाजारहाटमध्ये प्रत्येक गटाला संधी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे तालुका समन्वयक कृष्णा ठाकरे यांनी लोकमतला सांगितले.

160721\img-20210715-wa0069.jpg

बाजारहाट मध्ये आलेल्या वस्तुंच्या स्टॉलची पाहणी करताना आमदार राजकुमार पटेल