शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

By admin | Updated: May 12, 2016 00:42 IST

राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेशबंदी असतानाही मद्यधुंद अवस्थेतील सहा व्यक्तींनी वनरक्षकास कोका राखीव अभयारण्यात मारहाण केली.

प्रकरण वनरक्षकाला मारहाणीचे : सव्वातीन लाखांचा ऐवज जप्तभंडारा : राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेशबंदी असतानाही मद्यधुंद अवस्थेतील सहा व्यक्तींनी वनरक्षकास कोका राखीव अभयारण्यात मारहाण केली. यासोबतच वनरक्षकाजवळील रोख रक्कम व साहित्य पळविले होते. या प्रकरणात लाखनी पोलिसांनी आरोपींना एका दिवसात अटक करून त् यांच्याकडून ३ लाख २० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.नागझिरा वन्यजीव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्शीपार (कोका) राखीव वनपरिक्षेत्रात पर्यटन बंदी आहे. वनविभागाचे हे नियम धाब्यावर बसवून विरेंद्र दमाहे, संतोष लिल्हारे, सुखराम मोहारे, सचिन ठवकर, राजकुमार बिरनवारे, वसंत भवसागर यांनी वनपरिक्षेत्रात एम.एच. २८ व्ही ३८९२ या चारचाकी वाहनासह प्रवेश केला होता. राखीव वनपरिक्षेत्रात ते मद्य प्राशनावर बंदी असतानाही गाडीच्या खाली उतरून मद्यप्राशन करीत होते. यावर कर्तव्यावर असलेल्या संजय अंबुले या वनरक्षकाशी झालेल्या वादानंतर त्याला मारहाण करून त्याच्याजवळील साहित्य लांबविले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोलीस अधीक्षक विनिता साहू व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चाकाटे यांनी सर्व आरोपींना ३६ तासांच्या आत अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता सहाही जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.बुधवारला त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने साकोली तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. यावेळी सचिन ठवकर व राजकुमार बिरणवारे या दोघांची आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढविली असून अन्य चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सर्व आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन ज्याची किंमत तीन लाख रुपये, मारहाणीसाठी वापरण्यात आलेले गाडीतील पाने, लांबविलेल्या रकमेपैकी चार हजार रुपये व झटापटीनंतर सापडलेली १६ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची चैन असा एकूण ३ लाख २० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल लाखनी पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, पोलीस कोठडीतील आरोपींनी राखीव वनक्षेत्रात प्रवेश करून दारु पिऊन धिंगाणा घातल्याची कबुली दिली. यावेळी आलेल्या वनरक्षक अंबुले यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांना मारहाण केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती ठाणेदार चाकाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेशबंदी व अन्य प्रकारचे निर्बंध असतानाही प्रवेश करून मद्यपान करून शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या ठाणेदार चाकाटे यांनी ३६ तासाच्या आत मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस हवालदार भगवान खेर, पोलीस हवालदार हेमके यांनी केली. (शहर प्रतिनिधी)