शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कामाचा दर्जा, जबाबदारी सांभाळल्यास अपघात टळतील

By admin | Updated: January 12, 2016 00:18 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच विद्युत विभागाच्या संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाचा दर्जा व जबाबदारी सांभाळल्यास विजेचे अपघात होणार नाहीत, ..

पालकमंत्री पोटे : विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन अमरावती : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच विद्युत विभागाच्या संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाचा दर्जा व जबाबदारी सांभाळल्यास विजेचे अपघात होणार नाहीत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. महावितरण, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, उद्योग ऊर्जा व कामगार, विद्युत निरीक्षकांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १७ जानेवारीपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजिण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आ. यशोमती ठाकूर, एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता सुरेश पाटील, सुहास रंगारी, विद्युत निरीक्षक प्रमोद दहाट, इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर, संघटनेचे सचिव मिलिंद बहाळे, विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत. यावेळी पोटे यांच्या हस्ते विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागरण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे तसेच चित्रफितीचे उदघाटनही करण्यात आले. किरण पातुरकर म्हणाले, उद्योजक व कामगारात सद्यस्थितीत जागरूकताआली आहे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी विद्युत विभागाने दर्जेदार कामे करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्य अभियंता सुरेश पाटील म्हणाले विद्युत विभागाची सेवा ही ग्राहकाभिमुख आहे. सेफ्टी फस्ट, वर्कस नेक्स्ट अशी संकल्पना राबवावी, अपघात कमी होतील. यावेळी विद्युत निरीक्षक प्रमोद दहाट, मुख्य अभियंता सुहास रंगारी, कार्यकारी अभियंता गुटलिया यांची समयोचित भाषणे झाली. सप्ताहात विद्युत सुरक्षेसाठी चित्रकला स्पर्धा, चित्ररथ, पोस्टर्स, बॅनर्स, लिफलेट, पथनाट्य आदी उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)