शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

टॅ्रक्टरचा पाठलाग करताना युवकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: May 13, 2016 00:12 IST

ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दुचाकीवरील युवकांनी जाब विचारण्याकरिता टॅ्रक्टरचा पाठलाग केला. यामध्ये दुचाकीवरील युवक ट्रॅक्टरच्या चाकात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन युवक जखमी झाले.

दोन जखमी : पाठलाग करणे जीवावर बेतले वरूड : ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दुचाकीवरील युवकांनी जाब विचारण्याकरिता टॅ्रक्टरचा पाठलाग केला. यामध्ये दुचाकीवरील युवक ट्रॅक्टरच्या चाकात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन युवक जखमी झाले. घटना ९ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान इंदिरा चौकात घडली. वरूड पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही जखमींना अमरावती येथे उपचाराकरिता रवाना केले. टॅ्रक्टरने धक्का दिला म्हणून पाठलाग करणे जिवावर बेतल्याची घटनास्थळी चर्चा होती. प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव बंटी उर्फ कुलदीप बाबाराव फुले (२१रा. रोशनखेडा) असे आहे. तर संजय सुभाष तिडगाम (३२,रा.शहापूर पूनर्वसन), विनोद पोलजी कवडे (२८ रा.मालेगाव) अशी जखमींची नावे आहेत. युवक दुचाकीने स्थानिक इंदिरा चौकात आले होते. जवळून जाणाऱ्या ट्रॅक्टरने धक्का दिल्याने दोघे खाली पडून जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी रोशनखेडा येथील युवक करण फुले, कुलदीप फुले यांच्यासह अन्य काही युवकांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला. पाठलाग करून त्यांनी विष्णू मंगल कार्यालयाजवळ वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता कुलदीप उर्फ बंटी बाबाराव फुले चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जखमीला ग्रामीण रूग्णालयात दाखल करुन पुढील उपचाराकरीता त्यांना अमरावतीला पाठविण्यात आले. घटनेची फिर्याद करण फुले यांनी पोलीस स्टशेनमध्ये दिल्यावरुन पोलिसांनी टॅ्रक्टर चालकाविरुध्द भादंविच्या कलम २७९, ३३७,३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुबोध वंजारी, जमादार सोमेश्वर कपाटे, गोपाल सोळंके, विक्रांत कोंडे, नितेश वाघ, प्रशांत देशमुख करीत आहेत.