शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला घात; टँकरच्या धडकेत २ ठार, चौदा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 12:47 IST

रस्त्याच्या कडेला उलटून चेंदामेंदा झालेल्या ऑटोरिक्षातील प्रवासी गंभीर जखमी

तिवसा (अमरावती) : तिवसा तालुक्यातील कुऱ्हानजीक ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला टँकर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला, तर ऑटोरिक्षातील एकाचा मृत्यू झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी साडेसहानंतर ही घटना घडली.

तिवस्यावरून कुऱ्हााकडे येत असलेल्या टँकरने कुऱ्हा ते तिवसा मार्गाने निघालेल्या दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी एका ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होती. या दुचाकीची धडक बाजूला असलेल्या ऑटोरिक्षाला बसली. या अपघातात दुचाकीस्वार सोमा चापाजी कोरडकर (५०, रा. घोटा) यांचा रस्त्यावर घासत गेल्याने जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उलटून चेंदामेंदा झालेल्या ऑटोरिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यापैकी कैलास वाघमारे (५०, शेंदूरजना बाजार) यांचा तिवसा रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू झाला.

वाठोडा येथील ग्रामीण विकास विद्यालयानजीक हा भीषण अपघात झाला. जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल. करण्यात आले. रौनग विशाल तेलंग (साडेतीन वर्षे, हिंगणघाट), शीतल माटे (२५, जवळा), रेखा वाघमारे (५०, रा. शेंदूरजना बाजार), श्रीकृष्ण वाघमारे (५२, रा. शेंदूरजना बाजार), आरोही तेलंग (साडेतीन, रा. शेंदूरजना बाजार), सविता शेंद्रे (२८, रा. तिवसा), विराट शेंद्रे (३, रा. तिवसा), दीप्ती शेंद्रे (२०, रा. तिवसा), प्रांजली मोरझडे (३१, रा. तिवसा), उमेश शिंदे (४०, रा. मोझरी), सीमा तेलंग (२५, हिंगणघाट ), तनुश्री मोरझडे (१३, रा. तिवसा), सानवी मोरखेडे (६, रा. तिवसा) यांचा जखमींमध्ये समावेश असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. यापैकी गंभीर जखमी असलेली काही 'जणांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

टँकर पकडला

अपघातास कारणीभूत ठरलेला एमएच यू ८४०५ क्रमांकाचा टैंकर कुन्हा पोलिसांनी मार्डीनजीक पकडला. संतोष शंकर मोरे (४६) या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आटोरिक्षाचालक बेपत्ता?

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल .करण्यासाठी मदत केली. तथापि, अपघातग्रस्त ऑटोरिक्षा (एमएच २७ बीडब्ल्यू ३८३३) चा चालक मो. अहसान मो. अन्सार (रा. कुन्हा) हा अपघात घडल्यापासून बेपत्ता आहे. त्याच्याबाबत कुठलीही माहिती आतापर्यंत पुढे आलेली नाही.

तिसऱ्याचाही मृत्यू?

अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. तथापि, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती