शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात; अवघे कुटुंब संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 18:04 IST

नागपूरहून आपल्या गावी रक्षाबंधनासाठी कारने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने यात दोघे बापलेक जागीच ठार झाले, तर सासू व सुनेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देबाप-लेक जागीच ठारसासू-सुनेचा रुग्णालयात मृत्यू

ऑनलाईन लोकमतअमरावती : नागपूरहून आपल्या गावी रक्षाबंधनासाठी कारने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने यात दोघे बापलेक जागीच ठार झाले, तर सासू व सुनेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी नागपूर- औरंगाबाद हायवे रस्त्यावरील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.अनिल शारंगधर चंडिकापुरे (३२), कबीर अनिल चंडिकापुरे (४) हे दोघे बाप- लेक जागीच ठार झाले. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अनिलची पत्नी प्रज्ञा अनिल चंडिकापुरे (२८), तर सावंगी मेघे येथील उपचारादरम्यान अनिलची आई लिलाबाई शारंगधर चंडिकापुरे (६०), असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.अनिल मागील अनेक वर्षांपासून नागपूर येथे पेंटिंगच्या व्यवसायाकरिता राहत आहे. रविवार दिवस असल्याने व रक्षबंधनासाठी चंडिकापुरे कुटुंबीय सकाळी नागपूरहून एम एच ४९ यू ३४०९ या कारने चांदूर रेल्वे तालुक्यातील मूळच्या जवळा धोत्रा जाण्यासाठी निघाले होते. तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरुद्ध दिशेने येणाºया ट्रक क्रमांक एम एच १७ बीडी ९७४३ या ट्रकने कारला धडक दिली. यात संपूर्ण कार ट्रकखाली घासली गेली. तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील ठार बाप लेकाचा मृतदेह बाहेर काढला. यात जखमी झालेल्या प्रज्ञा व लिलाबाई यांना उपचारासाठी पुलगाव येथे नेताना प्रज्ञाचा पुलगाव येथे मृत्यू झाला. लिलाबाई यांचा सावंगी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार शिरसाट व जमादार महादेव पोकळे करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात