लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : धारणी येथे पाठविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी पथकाच्या वाहनाला घटांगनजीक पिकनिक पॉईंटजवळ रविवारी रात्री अपघात झाला. संबंधित वाहनावरील कर्मचारी दारूच्या अमलात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला.आरोग्य सेवेतील एमएच २७ बी एक्स १२६० या क्रमांकाचे वाहन रविवारी थ्रोट स्वॅब कलेक्शनसाठी धारणी येथे गेले होते. सायंकाळी ७ च्या सुमारास ते सेमाडोह येथे जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड यांच्या घरापुढे थांबले होते. या वाहनातील कर्मचारी चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पाण्याची बॉटल विकत घेऊन त्यांनी पुन्हा दारू ढोसली. हा प्रकार पाहून सुनंदा काकड यांनी त्यांना खडसावले. त्यानंतर रात्री घाटवळणाच्या रस्त्यात घटांग ते बिहाली दरम्यान असलेल्या पिकनिक पॉईंटजवळ हे वाहन उलटले.जेसीबीने सोमवारी हे वाहन सरळ करण्यात आले. चिखलदरा पोलिसांत यासंदर्भात कुठलीच नोंद नव्हती. धारणी तालुक्यातील खाजगी डॉक्टर आणि शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संशयित रुग्णांना रविवारी सकाळी ११ वाजता बोलावून त्यांची तपासणी केली होती. ते घेतलेले नमुने सुरक्षित राहिलेत की कसे, यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही.धारणी येथे कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या पथकाच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती आहे. पुढील माहिती घेऊन संबंधितांना विचारणा करू.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्य चिकित्सकरविवारी सायंकाळी ७ वाजता धारणीतून आरोग्य विभागाचे वाहन माझ्या घरापुढे थांबले. त्यातील कर्मचाऱ्यांनी वाहनातच दारूची पार्टी केली. हा गंभीर प्रकार पाहून त्यांना दम दिला असता, त्यांनी वाहन पुढे नेले. वाहनातील कर्मचारी मद्याधीन होते.- सुनंदा काकड , जिल्हा परिषदसदस्य, सलोना सर्कल
आरोग्य तपासणी वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST
आरोग्य सेवेतील एमएच २७ बी एक्स १२६० या क्रमांकाचे वाहन रविवारी थ्रोट स्वॅब कलेक्शनसाठी धारणी येथे गेले होते. सायंकाळी ७ च्या सुमारास ते सेमाडोह येथे जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड यांच्या घरापुढे थांबले होते. या वाहनातील कर्मचारी चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पाण्याची बॉटल विकत घेऊन त्यांनी पुन्हा दारू ढोसली. हा प्रकार पाहून सुनंदा काकड यांनी त्यांना खडसावले.
आरोग्य तपासणी वाहनाला अपघात
ठळक मुद्देघटांग : जिल्हा परिषद सदस्याने हटकल, मद्यपानाचा आरोप