शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:13 IST

अमरावती : मेळघाटातील दुर्गम गावात पेयजलाच्या उपलब्धतेसाठी जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी, तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याचे निर्देश ...

अमरावती : मेळघाटातील दुर्गम गावात पेयजलाच्या उपलब्धतेसाठी जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी, तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील यंत्रणेला सोमवारी दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात कुठलीही कुचराई न करता नागरिकांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

ना. ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम गावांत सलग दोन दिवस गोपनीय दौरा करून तेथील विकासकामांचा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावोगावच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

चिखलदरा तालुक्यातील जेतादेही येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावांत विविध विकासकामे, अंगणवाडी, शाळा सुधारणेच्या कामांना चालना मिळाली आहे. मनरेगाशी विविध विकासकामांची सांगड घालून मी समृद्ध तर गाव समृद्ध राबविण्यात येत आहे. धारणी तालुक्यातील मांगिया येथे भेट देऊन पुनर्वसन झालेल्या कुटुंबांच्या अडचणी जाणून घेतल्या.

बॉक्स

आहारासंर्दभात जनजागृती करा

त्यांनी मोथा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राला भेट दिली. स्थानिकांमध्ये हिमोग्लोबीन कमतरतेची समस्या आढळून येत असल्याने आहारासंबंधी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तेथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन त्यांनी कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. मोथा येथील रोहयोच्या कामांचा आढावा घेतला. सेमाडोह येथील पीएचसीला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली.

बॉक्स

स्कायवॉकमुळे पर्यटनाला मिळेल चालना

चिखलदरा येथे सिडकोव्दारे स्काय वॉकचे काम चालू आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा. प्रकल्पामुळे चिखलदऱ्यातील पर्यटनाला गती मिळेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तेथील वन विभागाच्या बागेला भेट देऊन विविध वनस्पती तसेच वन्यजीवांविषयी माहिती घेतली, तसेच त्यांनी स्पायडर म्युझियमलाही भेट दिली व म्युझियमच्या विकासासाठी आवश्यक बाबी मिळवून देण्यात येतील, असेही सांगितले.

बॉक्स

मधुमक्षिका पालनाद्वारे रोजगारनिर्मिती

शहापूरच्या शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाऊंडेशनव्दारे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहे. या केंद्राव्दारे आदिवासी महिलांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण मिळते. यातून स्थानिक महिलांना चांगला रोजगार मिळण्यासाठी आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

बॉक्स

औषधी वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजाती जतन करा

धारणी तालुक्यातील बारी येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या रोपवाटिकेला, औषध व दुर्मीळ प्रजाती संवर्धन केंद्राला भेट देऊन तेथे लागवड केलेल्या औषधी वनस्पतींची माहिती जाणून घेतली. औषधी वनस्पती तसेच दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे. याकरिता शासन स्तरावरून आवश्यक ती सर्व मदत करण्याकरिता कटिबध्द असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.