लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने सन- २००८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील मुख्यालयाने याप्रकरणी वस्तुनिष्ठ माहिती मागितली आहे. त्याअनुषंगाने एसीबीने ४ जानेवारी २०२० रोजी कुलगुरूंच्या नावे पत्र पाठविले आहे.विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून देयके काढण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याबाबतची तक्रार रसायनशास्त्राचे प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी येथील एसीबी अधीक्षकांकडे सन- २०१८ मध्ये केली होती. हे प्रकरण विद्यापीठाचे असल्याने एसीबीच्या अधीक्षकांनी मुंबईत मुख्यालयात ते पाठविले.राजेंद्र प्रसाद यांनी परिषदेच्या नावे भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे एसीबीकडे सादर केले होते. मुंबई येथील एसीबीने पत्र क्रमांक ११२८० नुसार लाचलुचपत प्रतिबंधक कलम १७ (अ)/ डी/ १६२ भष्ट्राचार प्रकरणाच्या चौकशीसाठी २१ डिसेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये परवानगी मागितली आहे. या अनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ६ जानेवारी २०२० रोजी विद्यापीठाचे विधी अधिकारी मंगेश जायले यांच्याकडे पत्र पाठविल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.४० हजार रूपये विद्यापीठ खात्यात जमा नाहीराष्ट्रीय कार्यशाळेच्या अनुषंगाने काही कामे खासगी व्यक्तींना सोपविली होती. मात्र, केमिकल पुरवठादार, निम्स कोचींग क्लासेस यांच्याकडून जमा होणारी ४० हजार रूपयांची रक्कम विद्यापीठ खात्यात जमा झाले नाही, अशी तक्रार राजेंद्र प्रसाद यांनी सन- २०१४ मध्ये कुलगुरू यांच्याकडे केली आहे.एसीबीने विद्यापीठाशी निगडित चार ते पाच प्रकरणांचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. यात ग्रीन केमेस्ट्री कार्यशाळेचाही उल्लेख आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्या प्रकारची कार्यवाही केली, हे एसीबीकडे पाठविले जाणार आहे.- मंगेश जायले,विधी अधिकारी, अमरावती विद्यापीठ
भ्रष्टाचार प्रकरणांवर एसीबीचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून देयके काढण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याबाबतची तक्रार रसायनशास्त्राचे प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी येथील एसीबी अधीक्षकांकडे सन- २०१८ मध्ये केली होती.
भ्रष्टाचार प्रकरणांवर एसीबीचा ‘वॉच’
ठळक मुद्देकुलगुरुंच्या नावे पत्र : विद्यापीठाकडून मागितली वस्तुनिष्ठ माहिती