शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर एएसआयवर एसीबीचा ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 00:03 IST

लाचेची मागणी करीत असल्याची लेखी तक्रार एकाने एसीबीकडे नोंदविली होती.  त्या अनुषंगाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदाराला खुरकटे व  मोहम्मद इस्माईल यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ३ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाईदरम्यान खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांना संशय असल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाचेची मागणी सिद्ध झाल्याने १२ ऑक्टोबर रोजी दोघांनाही एसीबीने अटक केली.  

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चोरीच्या दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्याकरता, अटक केली तर लवकर जामीन मिळविण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन प्रल्हादराव खुरकटे (५६) व हवालदार मोहम्मद इस्माईल शेख उमर (५२) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. शहर आयुक्तालयातील भातकुली पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. आपल्या साळ्याविरुद्ध  भातकुली ठाण्यात शेतातील पाण्याची मोटर चोरीचा गुन्हा दाखल असून, त्यात त्याला अटक न करण्याकरता, अटक केली तर लवकर जामानत मिळविण्याकरिता  मदत करण्याकरिता  खुरकटे व मोहम्मद इस्माईल हे लाचेची मागणी करीत असल्याची लेखी तक्रार एकाने एसीबीकडे नोंदविली होती.  त्या अनुषंगाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदाराला खुरकटे व  मोहम्मद इस्माईल यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ३ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाईदरम्यान खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांना संशय असल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाचेची मागणी सिद्ध झाल्याने १२ ऑक्टोबर रोजी दोघांनाही एसीबीने अटक केली.  

एसपींच्या नेतृत्वात कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे व सतीश उमरे, विनोद कुंजाम, नीलेश महिंगे, युवराज राठोड, रोशन खंदारे, चालक सतीश किटुकले, प्रदीप बारबुद्धे यांनी कारवाई केली.

 

टॅग्स :PoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण