शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वित्तीय संस्थांच्या कारभारावर ‘एसीबी’ची नजर, अवास्तव प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 18:40 IST

आकर्षक परताव्याचे प्रलोभन देऊन गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा वित्तीय संस्थांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जिल्ह्याच्या विशेष शाखेकडे (स्पेशल ब्रँच) सोपविण्यात आली आहे.

अमरावती : राज्यातील वित्तीय संस्थांच्या कारभारावर सरकारने नजर रोखली आहे. आकर्षक परताव्याचे प्रलोभन देऊन गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा वित्तीय संस्थांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जिल्ह्याच्या विशेष शाखेकडे (स्पेशल ब्रँच) सोपविण्यात आली आहे.अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून, आकर्षक व्याज, लाभांश, फायदा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे फायदे दाखवून निश्चित केलेल्या मुदतीत अनेक कंपन्या ठेवी स्वीकारतात. मुळातच असे अवास्तव व्याज देणे शक्य नसते. मात्र, तरीही प्रलोभनाला बळी पडून आतापर्यंत राज्यात हजारो नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यापार्श्वभूमिवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ४ (१) (दोन) अन्वये कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा पोलीस स्वत:हून संबंधित गुंतवणूकदार कंपनीविरूद्ध कुठलीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे फसवणूक करणा-यांची व फसवल्या जाणा-यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण गृहविभागाने नोंदविले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील अशा वित्तीय संस्थांची माहिती संकलित करावी, तसेच अशा वित्तीय संस्थांच्यावतीने ठेवी स्वीकारण्यासाठी केल्या जाणा-या जाहिरातींवर देखरेख ठेवावी, कोणीतीही वित्तीय संस्था ही ठेवीदारांच्या हितसंबंधास हानीकारक ठरेल, अशा रितीने काम करीत असेल किंवा ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या इराद्याने काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा वित्तीय संस्थांविरूद्ध कायद्याच्या तरतुदीनुसार तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहविभागाने पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी व अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत. यासाठी जिल्ह्याच्या विशेष शाखेला यासंदर्भात लक्ष ठेवण्याबाबत सूचित करावे, अशी सूचना गृहविभागाने केली आहे.

अमरावतीमध्ये हजारोंची फसवणूकआकर्षक परताव्याचे प्रलोभन देऊन आतापर्यंत हजारो अमरावतीकरांची २०० ते ३०० कोटींनी फसवणूक करण्यात आली आहे. यात श्रीसूर्या, पॅनकार्ड क्लब, लाईफ लाईन इन्व्हेस्टमेंट, राणा लॅन्डमार्क, सात्विक इन्व्हेस्टमेंटसह अन्य काही कंपन्यांचा समावेश आहे.