शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एसीबीला फरार आयपीएस यादवच्या अंतरिम जामिनाची वाट? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:20 IST

महिनाभरापासून रेती व्यावसायिकांकडून लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आयपीएस विजयकृष्ण यादव याचा १४ फेब्रुवारीला नांदेड सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याला दोन आठवडे होऊनही अमरावती एसीबी तपास त्याचा शोध घेऊ शकले नाही.

- चेतन घोगरे

अमरावती : महिनाभरापासून रेती व्यावसायिकांकडून लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आयपीएस विजयकृष्ण यादव याचा १४ फेब्रुवारीला नांदेड सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याला दोन आठवडे होऊनही अमरावती एसीबी तपास त्याचा शोध घेऊ शकले नाही. त्यामुळे एसीबी विभागाच्या कार्यवाहीवर संशय निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे फरार आयपीएस यादवच्या औरंगाबाद खंडपीठातून अंतरिम जामिनाची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सहा दिवसांत नांदेड, औरंगाबाद, हैद्राबाद व इतर शहरांमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास करूनसुद्धा एसीबी तपास पथकाला फरार आपीएस यादव गवसले नाही. अखेर  यादवांनी आजपर्यंत वापरलेल्या मोबाईल नंबरचा शोध घेऊन तपास करत असल्याचे अमरावती एसीबी विभागाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे हे गुन्हा दाखल झाल्यापासून एकच वाक्य सांगत आहे. नांदेड सत्र न्यायालयाने फरार आयपीएस यादवचा जामीन अर्ज २० दिवसांपूर्वी फेटाळून लावला. त्यानंतर यादव मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अंतरिम जामीनासाठी अर्ज करणार असल्याचे बोलले जात होते, तसेच पोलीस सूत्रानुसार, मागील दोन दिवसांपासून फरार यादव औरंगाबाद न्यायालयात वकीलामार्फत जामीन अर्ज दाखल करण्यासाठी येऊन गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, एसीबी तपास पथकाला याची कर्णोपकर्णी खबरही नसणे, हे संशयास्पद वाटते. अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार राज्य उन्हाळी अधिवेशनात हे तारांकित प्रश्न उपस्थित करणार होते. पण, त्यांना  दिल्लीहून वरिष्ठ नेत्यांनी न मांडण्याची तंबी दिल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणावर एसीबी व पोलीस विभागात चर्चा सुरू आहे. 

जामीनासाठी वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्नफरार आपीएस यादव तेलंगणा गृहमंत्री सचिवामार्फत औरंगाबाद खंडपीठातून अंतरिम जामीन मिळण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती आहे. 

तपास पथक यादवच्या सासरी जाणार अमरावती लाचलुचपत विभागाचे तपास अधिकारी पथक फरार आपीएस यादव याच्या सासरकडील मंडळीकडे जाऊनसुद्धा तपास करणार आहे, असे एसीबी विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती