शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा दुरुपयोग मला फसविण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

आमदार राणा यांच्या मते, महापालिका आयुक्तांवर शाईफेकीची घटना निषेधार्ह, पण या घटनेशी काहीही संबंध नाही. निरपराधांवर गुन्हे नोंदविले. कारागृहात पाठविले. सर्वेाच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो. मात्र, शहरात किती पुतळ्यांना शासनाची मान्यता आहे, हे  तरी विरोधकांनी सांगावे. मी राजकीय विरोध समजू शकतो, पण खोटाएफआयआर दाखल करून राजकीय आयुष्य संपविण्याचे षङ्यंत्र योग्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मी अमरावतीत नव्हतो. दिल्लीत असताना महापालिका आयुक्तांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंविच्या ३०७ या प्रकारचे गंभीर गुन्हे माझ्यावर दाखल होतात. हा केवळ राणांना राजकारणातून संपविण्याचा डाव असून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याची भावना आमदार रवि राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. महापालिकेत १७ फेब्रुवारी रोजी राजापेठ उड्डाण पुलावर परवानगी आणि नियमानुसार शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठराव मंजूर केला. मात्र, आता या ठरावावरून राजकारण सुरू झाले आहे. आमदार राणा यांच्या मते, महापालिका आयुक्तांवर शाईफेकीची घटना निषेधार्ह, पण या घटनेशी काहीही संबंध नाही. निरपराधांवर गुन्हे नोंदविले. कारागृहात पाठविले. सर्वेाच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो. मात्र, शहरात किती पुतळ्यांना शासनाची मान्यता आहे, हे  तरी विरोधकांनी सांगावे. मी राजकीय विरोध समजू शकतो, पण खोटाएफआयआर दाखल करून राजकीय आयुष्य संपविण्याचे षङ्यंत्र योग्य नाही.

महापालिका आयुक्तांच्या हस्ते पुतळा बसविणार राजापेठ उड्डाण पुलावरून महापालिका आयुक्तांनी पुतळा हटविला. पुतळ्यांची विटंबना केली.  गोदामात ठेवण्यात  आला. मात्र, लवकरच त्याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसेल, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या हस्ते पुतळ्याची स्थापना करण्यात येईल. तेच पुतळ्याला हारार्पण करून वंदन करतील, असेही आमदार राणा यांनी सांगितले. 

- तर शासनाकडून ठराव विखंडित करून आणामहापालिका आमसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेबाबत ठराव मंजूर केला. मात्र, हा ठराव अयोग्य असेल, तर विरोधकांनी शासनाकडे जाऊन तो विखंडित करून आणावा. शासन तुमचे आहे. सर्वेाच्च न्यायालयाची भाषा करून कायदेपंडित असल्याचा देखावा न करता शिवरायांप्रति विचार, श्रद्धा जोपासावी, असे आमदार रवि राणा म्हणाले.

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा