शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात रद्द करा; ट्रायबल फोरमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे

By गणेश वासनिक | Updated: December 3, 2023 17:50 IST

आदिवासींच्या आरक्षणावर हातोडा, ‘एक्साइज’च्या ५६८ जवान पदभरतीत केवळ तीनच जागा.

गणेश वासनिक, अमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यस्तरीय जवान (शिपाई) पदभरतीसाठी ५६८ जागांची जाहिरात काढली आहे. यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाकरिता केवळ ३ पदे आरक्षित ठेवून आदिवासींच्या आरक्षणावर हातोडा मारण्यात आला आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेली पदभरतीची जाहिरात रद्द करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे ट्रायबल फोरम, अमरावती जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी केली आहे.

संविधानानुसार आदिवासींना शिक्षण, नोकऱ्यांमध्ये साडेसात टक्के आरक्षण आहे. परंतु, महायुती सरकारमध्ये आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाला छेद देण्याचे काम सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवरून स्पष्ट दिसत आहे. राज्यात एकीकडे आरक्षणासाठी आंदोलनाचे वादळ उठलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारने आदिवासींच्या आरक्षणावर हातोडा मारल्याने बेरोजगार आदिवासी युवकांमधून संताप उमटला आहे.आमचा हिस्सा आम्हाला द्या

भारतीय संविधानाने आदिवासी समाजाला साडे सात टक्के आरक्षणाचा वाटा दिला आहे. त्यानुसार आमचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पदभरतीमध्ये आदिवासी समाजावर अन्याय होत आहे. सरकारने ही जाहिरात रद्द करून चुकवलेली बिंदुनामावली प्रथम दुरुस्त करावी. नंतर नव्याने जाहिरात काढून पदे भरावीत. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारjobनोकरी