लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची. गुणवंत धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच वाढली असून चक्क बाशांचा आधार देऊन ती उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. त्यांना यंदा विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.जावरा फत्तेपूर येथील गुणवंत धर्माळे यांनी प्रथमच त्यांच्या सहा एकरात कपाशी लागवड केली. पावसाची दडी, मजुराची वानवा, वातवरणातील बदल यावर नियंत्रण मिळविता येत नसले तरीदेखील योग्य नियोजनाद्वारे विपरीत परिस्थितीतही पीक घेता येते. यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच आहे. प्रत्येक झाडाला १५० ते १८० एवढी बोंडे लागली आहेत. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या पºहाटीने सहा फुटांची उंची गाठल्याने परिसरात चर्चा सुरू झाली होती. पात्यावर आल्यावर बोंडांची फूट पाहता अनेक शेतकरी, तज्ज्ञ, कृषी अधिकारी आदी त्यांच्या शेताला भेट देत आहेत.- अशी केली मशागतसहा एकर शेतात पºहाटी लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी शेताची दोनदा नांगरणी केली. पेरणीनंतर १२ दिवसांनी पाच वेळा खतांचे डोज दिले. ज्यामुळे जमिनीला आवश्यक ती अन्नद्रव्ये मिळाली. पीक डोलू लागल्यावर फवारणी व कीड व्यवस्थापन केले.सिंचनाचा अनुभव आला कामीसिंचनाचा अनुभव धर्माळे यांना आहे. यामुळे कोणत्या पिकाला किती पाणी हवे याची माहिती होती. यंदा पावसाने दडी दिल्याने अनेकांची पºहाडी मागे पडली असताना त्यांच्या शेतातील पºहाटी वाढलीच नव्हे तर बोंडांच्या भाराने झुकली आहे.शेतकरी निसर्गाच्या बिघडलेल्या चक्रामुळे हवालदिल झाला आहे. तसेच आत्महत्या करीत आहे. हे मनात ठेवूनच शेती करताना पारंपरिक नव्हे, तर नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्याचा ध्यास बाळगला होता.’’- गुणवंत धर्माळे,शेतकरी, जावरा फत्तेपूरसुधारित तंत्रज्ञान व योग्य व्यवस्थापन तसेच कृषी विभागाशी सतत संपर्क यामुळे गुणवंत धर्माळे यांचे कपाशी पीक इतरांसाठी आदर्श ठरले आहे. त्यांना एकरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन होईल.’’- अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी, तिवसा
अबब..! आठ फूट उंच पºहाटी!, शेतकºयाने साधली किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:30 IST
पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची.
अबब..! आठ फूट उंच पºहाटी!, शेतकºयाने साधली किमया
ठळक मुद्देएकरी ३५ क्विंटलचे सरासरी उत्पन्न : जावरा फत्तेपुर येथील तरुण शेतकºयाचा यशस्वी प्रयोग