मांस विक्रेत्यांवर कारवाई : मारहाणीचा प्रयत्न, फे्रजरपुरा ठाण्यात तक्रारअमरावती : अनधिकृत व उघड्यावर मांस विक्री बंद असतानाही मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर मंगळवारी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मात्र, मांस विक्रेत्यांनी कारवाईला विरोध करून महानगर पालिका कर्मचाऱ्यांनाच शिवीगाळ करीत धमक्या व मारहाणीचा प्रयत्न केला. फे्रजरपुरा पोलिसांनी मांस विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका यांनी संयुक्तरीत्या अनधिकृत व उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. मंगळवारी सकाळपासून मांस विक्रेत्यांची परवाने तपासणी मोहीम फे्रजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत चपराशी पुऱ्यातून सुरु करण्यात आली. यावेळी मांस विक्रेत्यांजवळील परवाने तपासणी करण्यात आले असून बहुतांश मांस विक्रेते उघड्यावर मांस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
By admin | Updated: July 22, 2015 00:36 IST