शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मामानेच केले भाचीचे अपहरण

By admin | Updated: September 9, 2016 00:32 IST

तालुक्यातील पांढरी खानमपूरच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातून अकोला येथील एका युवकाने सख्ख्या भाचीचे अपहरण केले.

पांढरीची घटना :आरोपी अकोलखेडहून गजाआडअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील पांढरी खानमपूरच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातून अकोला येथील एका युवकाने सख्ख्या भाचीचे अपहरण केले. तिला अकोट तालुक्यातील अकोलखेड शेत शिवारात नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. महत्प्रयासाने ती मामाच्या तावडीतून सुटून तुरीच्या शेतात लपल्याने पुढील अनर्थ टळला. अकोलखेडच्या गावकऱ्यांनी आरोपीला पकडून व मुलीला शोधून अकोट पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. अकोट पोलिसांनी आरोपी राजू आठवले रा. पंचशिलनगर याला अटक केली आहे. ठाणेदार सतीश पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे घटनेचा तपास करीत आहेत. पांढरी खानमपूर येथील गरीब कुटुंबातील शेतमजुराची मुलगी तिच्या दोन बहिणीसह याच गावातील सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. ६ सप्टेंबर मंगळवारी दुपारी ४ वाजून ४८ मिनिटांनी या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर नोंद करुन आरोपीने वसतिगृहात प्रवेश केला व आपल्या भाचीला भेटीसाठी बोलावले. तुझी आई अतिशय आजारी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे सांगून तिला तातडीने आपल्या सोबत अकोला येथे येण्याचे सांगितले. मामावर भरवसा ठेवून तिने वसतिगृहात सुटीचा अर्ज दिला व ती मामाच्या दुचाकीवर बसली. आरोपीने अकोट मार्गे अकोलखेडकडे दुचाकी वळविली व तो कच्च्या रस्त्याने निघाला. हा रस्ता जवळचा असल्याचे त्याने सांगितले.सख्खा मामा असल्याने तिला संशय आला नाही.व ती बिनधास्तपणे निघाली.आरोपीजवळ आढळला चाकूअंजनगाव सुर्जी : रस्त्यात पाईपलाईनचे खोदकाम करणाऱ्या मजुरांनी त्याला थांबवून रस्ता पुढे खराब असल्याचे सांगूनही तो थांबला नाही व आरोपीने भाचीला निर्जन शेतात नेले आणि तिच्या गळ्यावर चाकु ठेवला व आपल्या दृष्ट कृत्याची मागणी केली. घटनेच्या तीव्र तणावाने मुलगी बेशुद्ध झाली. ती मेली असे समजून आरोपी घाबरला व तेथून परतला आणि ज्या मजुरांनी त्याला थांबविले होते त्यांना आपणास वाटमाऱ्यांनी अडवून मारठोक केली व आपली भाची पळवून नेली, असे खोटेच सांगितले. त्यांनी आरोपीला माराच्या खुणा नसल्याचे सांगून त्याची अंग झडती घेतली असता मोठा चाकू आढळून आला. त्यामुळे संशय येवून त्यांनी आरोपीला पकडून ठेवले व पोलिसांना फोन केला. अकोट पोलिसांनी आरोपीस घेऊन पोलीस स्टेशन गाठले व त्याची चौकशी करुन विचारणा केली पण आरोपी सतत खोटा बोलून दिशाभूल करीत राहीला. इकडे अकोलखेडमध्ये ही वार्ता पसरल्याने सरपंच व गावकरी युवकांनी मुलीच्या तपासात रात्रभर शेतशिवार पिंजून काढले पण मुलगी दिवस निघाल्यावर एका शेतकऱ्याला त्याच्या तुरीच्या शेतात आढळल्याने तिला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर खरा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना दिली. घटनेच्या दिवशी आरोपी घरी आला होता व त्याने बॅग ठेवून कपडे धुण्याची मागणी केली होती. मात्र ते असे काही करेल, असे मुलीच्या कुटुंबांच्या मनातही आले नाही. आरोपीला भादंविच्या गंभीर गुन्ह्यात व पोस्को कायद्यांतर्गत अटक करुन त्याचा पीसीआर घेण्यात आला आहे. मुलगी वसतिगृहात नवव्या वर्गात शिकत असून मुलीला आई वडील वगळून इतर व्यक्तीच्या ताब्यात वसतिगृह प्रशासनाने का दिले? हा लाख मोलाचा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)