आतिषच्या वडिलांचा माफीनामा फसाटेंची सक्तीची रजा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:37+5:30

मंगळवारी सकाळी अपघातात जखमी झालेल्या आतिषचा मृत्यू झाला. औषधोपचाराचा अभाव व डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच आतिषचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी राऊन्डवर असलेल्या डॉ. शशिकांत फसाटे यांच्यावरच हात उगारला. नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांनी डॉ. शशिकांत फसाटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याबद्दल पत्र काढले.

Aatish's father's pardon canceled | आतिषच्या वडिलांचा माफीनामा फसाटेंची सक्तीची रजा रद्द

आतिषच्या वडिलांचा माफीनामा फसाटेंची सक्तीची रजा रद्द

Next
ठळक मुद्देसीएसच्या कक्षात बैठक : इर्विनमधील डॉक्टरचे हल्लाप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरवर झालेल्या मारहाण प्रकरणानंतर मृतक आतिष ईश्वर लोणारे याच्या वडिलांनी बुधवारी माफीनामा लिहून दिला. त्यामुळे जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांनी वैद्यकीय अधिकारी शशिकांत फसाटे यांची सक्तीच्या रजेचा निर्णय रद्द केला.
मंगळवारी सकाळी अपघातात जखमी झालेल्या आतिषचा मृत्यू झाला. औषधोपचाराचा अभाव व डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच आतिषचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी राऊन्डवर असलेल्या डॉ. शशिकांत फसाटे यांच्यावरच हात उगारला. नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांनी डॉ. शशिकांत फसाटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याबद्दल पत्र काढले. हे प्रकरण कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान घडलेल्या प्रकाराची खंत मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त करून डॉ. फसाटे यांना माफी मागितली. त्यामुळे त्यांनीही नातेवाईकांच्या भावनांचा विचार करून पोलीस तक्रार दिली नाही. बुधवारी आतिषचे वडिल ईश्वर लोणारे यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांची भेट घेऊन, त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.
नातेवाईकांनी भावनेच्या भरात चुक केल्याची कबुल करून डॉ. फसाटेंची सक्तीची रजा रद्द करण्याबाबत विनंती केली. यावेळी त्यांच्यासोबत मार्डीचे सरपंच हर्षल लोणारे उपस्थित होते. त्यांची विनंतीला मान देऊन सीएस यांनी डॉ. फसाटे यांच्या सक्तीच्या रजेचा निर्णय मागे घेतला. यावेळी इर्विन रुग्णालयातील बहुतांश वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भावनेच्या भरात मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर हल्ला केला. याविषयी कायद्यात सात वर्षांच्या कठोर शिक्षेची तरतुद आहे. मात्र, त्या मुलांच्या भविष्यांचा विचार करता, तसेच माफी मागितल्याने आम्ही निर्णय मागे घेतला. डॉ. फसाटेंची सक्तीची रजा रद्द केली. ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहे.
- श्यामसुंदर निकम, शल्यचिकीत्सक, ईर्विन.
 

Web Title: Aatish's father's pardon canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर