शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उकृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:32 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण, आदिवासी भागात आरोग्याचा जागर करणाऱ्या तसेच गरोदर माता व नवजातांच्या सुदृढ आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आशा सेविकांना बुधवार, ३ जानेवारी रोजी गौरविण्यात आले.

आॅनलाईन लोकमतअमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण, आदिवासी भागात आरोग्याचा जागर करणाऱ्या तसेच गरोदर माता व नवजातांच्या सुदृढ आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आशा सेविकांना बुधवार, ३ जानेवारी रोजी गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे हे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम, दिलीप निकोसे, संतोष माने, दिलीप चºहाटे, रमेश बनसोड, रवींद्र किटुकले यांच्या हस्ते आशा सेविकांचा गौरव करण्यात आला.विचोरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न जसापूर येथील प्रतिभा ढोमणे यांनी उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला. सलोना येथील सोनकी खडके यांना द्वितीय पुरस्काराने गौरविले. सर्वोकृष्ट गटप्रवर्तिकेचा पुरस्कार टेंब्रुसोडा येथील रूपाय बेलसरे यांना, तर द्वितीय पुरस्कार करजगाव येथील वंदना पारधी यांनी मिळविला. पीएचसी अंतर्गत मंगरूळच्या मनीषा भुसारी, हिवखेडच्या वैशाली चौधरी आणि आमला एंडली येथील अंजली तानोड यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.जिल्हाभरातील १४ आशा स्वयंसेविकांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.विशेष म्हणजे, आशा स्वयंसेविका योजनेत सन २०१६-१७ मध्ये उकृ ष्ट कार्य केल्याबद्दल तुकाराम आऊलवार, स्नेहल लोखंडे, सरला सोनोने, गोकुल ठाकूर, पंकज औरंगपुरे, संतोष निंभोरकर, मनीष हटवार, उमेश आगरकर, गोपाल क्षीरसागर, धनंजय साऊरकर आदी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांचाही सन्मान करण्यात आला.पुरस्कार वितणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे संचालन उमेश आगरकर, तर आभार प्रदर्शन शशिकांत तभाने, साईकिरण खांडरे यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शशिकांत तभाने, अशोक कोठारी, नीलेश देविकर, प्रफुल्ल रिधोरे, अमोल ढोले, राहुल वानखडे, दिनेश नागे आदींनी आयोजनात सहकार्य केले.