आॅनलाईन लोकमतवरूड : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ आदी मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटना (आयटक) ने शनिवारी आ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी मोर्चा नेला. यावेळी निवेदनकर्त्यांनी आमदारांसोबत चर्चा करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे कायम ठेवण्यासह आदी मागण्यासाठी संघटनेने वारंवार आंदोलने केली. परंतु, राज्य शासनाने न्याय मिळाला नाही. या मागण्या शासनाकडे मांडाव्या, अशी मागणी निवेदनातून आ. अनिल बोंडे यांच्याकडे शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी बी.के. जाधव, अरुणा देशमुख, मीरा कैथवास, वंदना भोपसे, वरूडच्या उज्ज्वला गुळांधे, रत्नमाला ब्राम्हणे, बेबी ब्राम्हणे, कांता पाटील, वनिता कोसे, सुनीता ब्राम्हणे, मानेकर, मोरे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. यानंतर खा. रामदास तडस यांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले. ज्यांचे वय १ एप्रिल २०१८ रोजी ६० वर्षे होतील त्यांना सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांनी ६० रुपये मासिक मानधनावर नोकरी केली, त्यांच्यावर हा अन्याय असल्याने जुन्या अंगणवाडी कर्मचाºयांकरिता वयोमर्यादा ६५ वर्षे ठेवावी, ही यामागील भूमिका असल्याचे कर्मचारी संघटनेने कळविले
अंगणवाडी सेविकांचा आमदार निवासावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:36 IST
एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ आदी मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटना (आयटक) ने शनिवारी आ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी मोर्चा नेला.
अंगणवाडी सेविकांचा आमदार निवासावर मोर्चा
ठळक मुद्देनिवेदन : शासनदरबारी न्याय मिळवून देण्याची मागणी