शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

वाघाला मारून अवयव काढली; पाच आरोपींना तीन वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:31 IST

न्यायालयीन निर्णय : सन २०१३ मध्ये आढळला होता मृत वाघ

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : वाघाची शिकार करून सापळ्यामधून नखे व दात काढून घेणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक न्यायालयाने तीन वर्षे कारावास, प्रत्येकी १० हजार रुपये दंड, न भरल्यास प्रत्येकी तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक आठ आर. टी. घोगले यांच्या न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी हा निर्णय दिला. तब्बल ११ वर्षानंतर हा निर्णय आला आहे.

पूर्व मेळघाट विभागातील कुंडी सर्व्हे नं.१, अंबापाटी बिट, टेंबूरसोंडा राऊंड, जामली परिक्षेत्रात ऑक्टोबर २०२३ मध्ये वाघाच्या शिकारीची ती घटना उघड झाली होती. शिक्षाप्राप्त आरोपींमध्ये नानाजी भुरा साकोम, बाबुलाल भुरा साकोम, सुनील बिसराम मावसकर, सुंदरलाल जंगल्या माडेकर आणि सुरेश रंगू बेलकर (सर्व रा. चिखलदरा. जि. अमरावती) यांचा समावेश आहे. याप्रकरणी, पूर्व मेळघाट वन विभागाच्या सहायक वन संरक्षकांनी वनगुन्हा दाखल केला होता.

२०१३ रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबापाटी बिटमध्ये वन अतिक्रमण तपासणी केली. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी जनावर कुजल्याचा वास आला. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी खोदून पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना झाडांचा पाला व फांद्याने जनावर झाकून ठेवल्याच्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२३ रोजी पंचनामादरम्यान ती जागा खोदली असता तेथे सडलेल्या कातडीसह वाघाचा सापळा आढळून आला. सापळ्यामधून संबंधित वाघाचे नखे आणि दात काढून घेतल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Amravatiअमरावती