शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

परतवाड्यात घरफोडी करणाऱ्या जोडीला मध्यप्रदेशात केले जेरबंद

By प्रदीप भाकरे | Updated: May 18, 2023 17:22 IST

Amravati News परतवाडा येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने १८ मे रोजी ही कारवाई केली.

अमरावती : परतवाडा येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने १८ मे रोजी ही कारवाई केली. त्या घरफोड्यांकडून परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. त्यांच्याकडून ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            एलसीबीनुसार, दिपेंद्र संतोष हारोडे (२२) व रोशन उर्फ रोशू दीपक नागवत (२०, दोघेही रा. हमलापूर, मध्यप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णूनगर येथील रहिवासी श्रीकृष्ण मधुकर शेकोकार हे कुटुंबासह लग्नानिमित्त बाहेरगावी गेल्यावर त्यांचे घर फोडून ५४ ग्रॅम सोने, १८ ग्रॅम चांदिचे दागिने व रोख १ हजार ६०० रुपये लंपास करण्यात आले होते. तसेच त्यांच्या शेजारील दोन घरे फोडून ८ ग्रॅम सोने, ४ ग्रॅम चांदिचे दागिने व रोख ३ हजार रुपये असा एकूण २ लाख २९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला होता. या प्रकरणी श्रीकृष्ण शेकोकार यांनी ७ मे रोजी परतवाडा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली स्थानिक गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती. तपासात त्या गुन्ह्यात मध्यप्रदेशमधील हमलापूर येथील दिपेंद्र हारोडे व रोशन नागवत यांचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार या दोघांना मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ६२ ग्रॅम सोने, २२ ग्रॅम चांदी, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपी सराईतदोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मध्यप्रदेश व महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, संतोष मुंदाने, त्र्यंबक मनोहर, युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, सय्यद अजमत, अमोल केंद्रे, सागर नाठे, प्रमोद शिरसाट, हर्षद घुसे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी