शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील अधिकाऱ्याने पत्नीच्या नावे लाटला 'फ्लॅट'; पीएम आवास योजनेला छेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 11:26 IST

Amravati : 'सिस्टीम'मधून पळविले गरिबांचे घर; 'लोकमत'कडे पुरावे

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावतीः'सर्वांसाठी घरे' संकल्पनेवर आधारित 'प्रधानमंत्री योजनेची अंमलबजावणी आवास करताना अमरावती महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने चक्क पत्नीच्या नावे सदनिका लाटली आहे. यासंदर्भात 'लोकमत'कडे पुरावे हाती लागले असून 'सिस्टीम'ला छेद देत 'मॅनेजर'ने हा धक्कादायक प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे.

अमरावती महानगरपालिकेमार्फत शासनाच्या 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सदनिका (फ्लॅट) बांधण्यात आल्या आहेत तर काही सदनिकांचे बांधकाम अद्यापही सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेमार्फत विशेष आर्थिक दुर्बल घटकांकरिता बांधकाम करण्यात आलेल्या निंभोरा येथील महानगरपालिकेतील सदनिकेमध्ये एका अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावे गरिबांच्या हिश्श्याचा फ्लॅट लाटला आहे. महानगरपालिकेमार्फत निर्माण झालेल्या सदनिकेमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना सदनिकेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. परंतु ज्यांना अशा लाभाची आवश्यकता नसताना त्या अधिकाऱ्याने 'फ्लॅट' रूपी लाभ मिळविला आहे. आजही अमरावती शहरात लाखो गरीब कुटुंब ज्यांच्याकडे स्वतःच्या नावे कुठेही घर नाही, अशी हजारो कुटुंब सदनिकेच्या प्रतीक्षेत असताना महापालिकेतील या अधिकाऱ्याने 'सिस्टीम'ला मॅनेज करून एक प्रकारे गरिबांना वंचित ठेवण्याचे काम केले आहे. हा प्रकार म्हणजे शासनाच्या अभिनव योजनेला हरताळ फासल्याचे स्पष्ट होते. 

खासदारांनी जेम पोर्टल खरेदीवर ओढले ताशेरे अमरावती महानगरपालिकेत २७ ऑगस्ट रोजी खासदार बळवंत वानखडे यांनी आढावा घेतला. याच बैठकीत खा. वानखडे यांनी जेम पोर्टलवर खरेदी मास्टर म्हणून या अधिकाऱ्याचा उद्धार केला होता. चेहऱ्यांवर नाजूकपणा आणणे ही त्यांची खासियत आहे. 'सिस्टम'मध्ये सर्व काही करायचे पण 'तो मी नव्हेच... अशी ओळख वजा छवी निर्माण करायची हा हातखंडा या अधिकाऱ्याचा आहे. त्यामुळे गरिबांचा हक्क लाटणाऱ्या या अधिकाऱ्यावर आयुक्त साहेब कोणती कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे.

... ही तर पंतप्रधानांच्या स्वप्नाला तिलांजली देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या मालकीचे घरे मिळवून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला अमरावती महापालिकेतील अधिकाऱ्याने तिलांजली देण्याचा प्रकार ठरला आहे. ही सदनिका मिळविण्यासाठी 'निधी' कोठून आणला. यासाठी गुप्ता'ला कुणी आणले, याबाबत प्रशासनाने संशोधन केल्यास अनेक धक्कादायक प्रकरणे उजेडात आल्याशिवाय राहणार नाही, असे कागदपत्रांवरून दिसून येते. सदनिका मिळविण्यासाठी शासनाच्या ज्या काही अटी, शर्ती आहेत, त्या सर्व या अधिकाऱ्याने गुंडाळल्या आहेत.  

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती