शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी

By गणेश वासनिक | Updated: December 7, 2022 20:30 IST

अल्पवयीन मुलांचा वापर, सुटे भाग करून लपवायचे गाड्या

परतवाडा : अल्पवयीन मुलांच्या सहकार्याने दुचाकी चोरायची व त्यानंतर तिचे सुटे भाग करून ते भंगार विक्रेता व इतर ठिकाणी विकायची, त्यात हातखंडा असलेल्या आरोपीला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मोठ्या प्रमाणात दुचाकींचे सुटे भाग विकल्याचा प्रकार या घटनेने पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, यातील दुचाकी नजीकच्या हत्तीघाट परिसरातील जंगलात लपवून ठेवल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

अंकुश गणेश दुरतकर (२०, रा. रामनगर, परतवाडा), पवन गजानन तनपुरे (१९, रा. साई मंदिरजवळ, परतवाडा), भंगार दुकानदार शेख इकबाल शेख युसूफ (४३, रा. अन्सारनगर, परतवाडा) यास अटक केली, तर दोघे फरार आहेत. पोलिस त्यांचा तपास घेत आहेत. त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या या टोळक्यात तीन अल्पवयीन मुलांसह चौघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे, पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, ठाणेदार संदीप चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मनोज कदम, सचिन होले, रवींद्र बहुरीया, शफिक शेख, रमन हिवराळे, विवेक ठाकरे, सचिन कोकने, मंगेश साव, मंगेश पाटील, चालक सूरज तांडीलकर, अंकुश धोटे करत आहेत.सीसीटीव्हीतून उघड झाला प्रकार२५ नोव्हेंबर रोजी शहरातील आठवडी बाजार परिसरातून दुचाकी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे प्रगटीकरण शाखेला प्राप्त झाले. त्याची बारकाईने पाहणी करण्यात आली असता, एक अल्पवयीन मुलगा पार्क केलेल्या ठिकाणाहून दुचाकी बाजूला नेऊन काही अंतरावर उभ्या दोघांच्या ताब्यात देत असल्याचे दिसत होते.हत्तीघाटच्या जंगलात पुरून ठेवले सुटे भागआरोपींनी तपासादरम्यान दिलेल्या माहितीवरून हत्तीघाट येथील जंगलामध्ये आरोपींनी असंख्य दुचाकी चोरून त्याचे भाग वेगवेगळे करून जंगलातील खड्ड्यात पुरून ठेवले. त्यात क्रमांक खोडलेले तीन इंजिन, चार चेचीस, आठ इंजिनसह असणारे चेचीस, सात सायलेन्सर, सहा मडगार्ड, दहा शॉकअप, सात रिंग (टायरसह), एक पेट्रोल टाकी, एक ब्रेकपट्टी, दोन बॅटरी असा सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Amravatiअमरावती