शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आय लव यू; तेरा फोटो देखके दिल आ गया है; बॅंक मॅनेजर महिलेला व्हाईस मॅसेज

By प्रदीप भाकरे | Updated: April 14, 2023 14:56 IST

ठाण्याच्या आरोपीचा प्रताप

अमरावती : ‘आय लव यू. तेरा फोटो देखके तेरेपें दिल आया है, जानेमन पैसा मत दे, सिर्फ एक बार तेरेसाथ खाना खाना चाहता हू’ असा व्हाईस मॅसेज टाकून एका बॅंक सहव्यवस्थापक महिलेचा विनयभंग करण्यात आला. ७ एप्रिल रोजी ४.२० ते ५.४२ दरम्यान तिला एकुण आठ व्हाईस मॅसेज करण्यात आले. त्यात तिला अश्लिल शिविगाळ देखील करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी राजेश मिश्रा (रा. ठाणे) याच्याविरोधात १३ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.

येथील एका बॅंकेत सहायक व्यवस्थापक असलेल्या महिलेकडे बॅंक शाखांच्या नुतनीकरणाची जबाबदारी आहे. अशाच एका बॅंक शाखेच्या नुतनीकरणाचे काम ठाणे येथील एका कंपनीकडे असून, त्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आरोपी राजेश मिश्रा काम पाहतो. त्या फर्मचा प्रतिनिधी म्हणून सदर महिला व्यवस्थापकाची त्याच्यासोबत ओळख झाली. त्यातून त्याने ७ एप्रिल रोजी तिला व्हाईस मॅसेज पाठविला. तो वृध्द इंजिनिअर आणखी पाच दहा वर्षे जीवंत राहिल. पण तुझा फोटो पाहून माझे मन तुझ्यावर आले आहे, असे त्यात नमूद होते. ते एकुण आठ व्हाईस मॅसेज एैकताच महिलेने ते मॅसेज आरोपीने डिलिट करण्यापुर्वी आपल्या मित्राला पाठविले. तर थोडयाच वेळात आरोपीने ते मॅसेज डिलिट केले.

अन्य दुसऱ्यालाही पाठविला मॅसेज

आरोपी राजेश मिश्रा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्या बॅंकर महिलेच्या सहकाऱ्याच्या व्हॉटसॲपवर त्याचदिवशी सायंकाळी ६.४१ ते ६.४४ दरम्यान व्हाईस मॅसेज पाठविला. त्यात महिलेसह तिचा अन्य एक सहकारी गायब असल्याने काम कसे करायचे, ते समजत नसल्याचे म्हटले. असे काम करून दाखवेल, की तुम्ही विचार करू शकणार नाही म्हणत बॅंकर महिलेशी एक मिटिंग करवून द्या, तिला एकटीला एकदा पाठवा, असे तो व्हाईस मॅसेजमधून म्हणाला. यातून आरोपीने आपल्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्हाईस मॅसेज पाठविल्याची महिला बॅंकरची खात्री पटली. तिने ती बाब तिच्या वरिष्टांनी सांगितली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती