शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अमरावती विद्यापीठात नव्या वित्त व लेखाधिकाऱ्यांपुढे आर्थिक शिस्तीचे मोठे ‘चॅलेंज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 14:59 IST

Amravati : जनरल फंडाला लागले बूड, व्यवस्थापन परिषदेने घसारा फंडातून दहा कोटी काढण्याला दिली मंजुरी

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नियमित वित्त व लेखाधिकारी पदाचा पुष्कर देशपांडे यांनी १ ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला. देशपांडे विद्यापीठाचे सर्वांत तरुण अधिकारी असून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलम १८ (२) नुसार नियुक्त करण्यात आलेले दुसरे सनदी लेखापाल ठरले आहेत. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथून पाच वर्षांच्या नियुक्तीवर आलेल्या देशपांडे यांच्या अनुभवाचा फायदा होणार असून, विद्यापीठाची गंगाजळी संपत असताना आर्थिक शिस्त लावण्याचे मोठे ‘चॅलेंज’ त्यांच्यासमोर आहे. विद्यापीठ कायद्याच्या कलम १८ नुसार वित्त व लेखाधिकारी विद्यापीठाचा प्रमुख वित्त, लेखा व लेखा परीक्षा अधिकारी असतो. आर्थिक वर्षातील आवर्ती व अनावर्ती खर्च विद्यापीठाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होत नाही, याची खात्री करणे, तसेच वाटप करावयाच्या सर्व रकमा या ज्या प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या आहेत किंवा त्या रकमांचे नियत वाटप करण्यात आलेले आहे, त्याच प्रयोजनासाठी त्याचा खर्च केला जातो याची खात्री करणे, रोख रक्कम व बँकेतील शिल्लक रकमा आणि गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे, उत्पन्न वसुलीच्या कार्यपद्धतीवर आणि प्रगतीवर लक्ष ठेवून उत्पन्नाचे प्रभावी व्यवस्थापन करणे अशी विविध महत्त्वाची कामे वित्त व लेखा अधिकाऱ्यास पार पाडावी लागणार आहेत.

घसारा निधीतून दहा कोटी काढण्यास मंजुरीसनदी लेखापालांची वित्त व लेखा अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच व्यवस्थापन परिषदेची सभा संपन्न झाली. जनरल फंडाला अखेरची घरघर लागल्याने व्यवस्थापन परिषदेत घसारा निधीवर डल्ला मारण्याचा मुद्दा सादर करण्यात आला होता. प्रशासनाने घसारा निधीतून जवळपास ५० कोटी काढण्याची मागणी केली होती; परंतु व्यवस्थापन परिषदेने दहा कोटींच्या रकमेला मंजुरी दिली. कंत्राटदार देणी व सीएचबी प्राध्यापकांचे वेतन हा सगळा जनरल फंड संपल्यानंतर आता घसारा निधीला पाय फुटले असून विद्यापीठाची आर्थिक घडी पूर्णतः विस्कळीत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पुरवणी अंदाजपत्रकाचे चोचले थांबवा२०२४-२५ वर्षाच्या अंदाजपत्रकातील खरेदी करण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना पुरवणी अंदाजपत्रकाची तयारी वित्त विभागाने सुरू केली असून सर्व विभागांना पुरवणी अंदाजपत्रकात तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तिजोरीतील ठणठणाट पाहता आणखी किमान दोन वर्षे खरेदीवर निर्बंध घालणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या संख्येत कपात करणे, नवीन बांधकामांना परवानगी नाकारणे, वर्क ऑडिट करून सेवानिवृत आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, जेवणावळी बंद करणे, विनाअनुदानित तत्त्वावरील अनावश्यक विभाग बंद करणे यासारखे कठोर उपाय कुलगुरूंनी योजले तरच विद्यापीठाचा जनरल फंड पुन्हा शंभर कोटींकडे वाटचाल करेल, अन्यथा जनरल फंडाला लागलेल्या अखेरच्या घरघरीमुळे एकूणच डोलारा कोसळेल हे नक्की!

टॅग्स :Amravatiअमरावती