शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

९४ बालकांचा ‘टू-डी इको’ केला, ३० जणांना हृदयविकार आढळला

By उज्वल भालेकर | Updated: January 4, 2024 21:58 IST

जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी तपासणी, लवकरच होणार शस्त्रक्रिया

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मंगळवारी हृदयाचा त्रास होत असलेल्या ९४ बालकांचे टू-डी इको करण्यात आले. यामध्ये ३० बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आरबीएसकेअंतर्गत मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. नवीन वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बालकांची तपासणी करण्यात आली.

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे याचे वेळीच योग्य निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. लहान मुलांनाही जन्मत:च हृदयविकार होतात. यामध्ये त्यांच्या हृदयाला छिद्र असणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे यांसारखी लक्षणे असतात. त्यामुळे अशा बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे वेळीच निदान करून मोफत उपचार केले जातात. त्यामुळे हृदयविकार आजाराचे निदान करण्यासाठी ‘टू डी इको’ हे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या टू-डी इको मशीनवर मंगळवारी हृदयाचा त्रास जाणवत असलेल्या ९४ बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३० बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्यावर लवकरच मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी रुग्णांची तपासणी आचार्य विनोबा भावे रुग्णालय येथील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू गोमासे यांनी केली. यावेळी समन्वयक प्रतीक गडकरी यांनी त्यांना मदत केली. ही तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी आरबीएसके जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नीलेश पुनसे, सांख्यिकी अन्वेक्षक प्रसाद अनासने, डीईआयसी व्यवस्थापक डॉ. प्रीती रोडे व जिल्ह्यातील संपूर्ण वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल