शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

मतदार यादीतील ८८ हजार नावे छायाचित्रांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST

अमरावती : मतदार यादीत अद्यापही छायाचित्र ‘अपडेट’ नसलेल्या ९१ हजार १८७ मतदारांपैकी केवळ ३ हजार ७३ छायाचित्रे जमा झाली ...

अमरावती : मतदार यादीत अद्यापही छायाचित्र ‘अपडेट’ नसलेल्या ९१ हजार १८७ मतदारांपैकी केवळ ३ हजार ७३ छायाचित्रे जमा झाली आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून गृहभेटीनंतर अनेक मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत असे ८८ हजारांवर मतदार आहेत. १९ जूनपर्यंत ‘नो फोटो व्होटर्स’ची छायाचित्रे जमा न झाल्यास ती नावे वगळण्यात येतील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी स्पष्ट केले.

छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्याचे कार्य जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून होत आहे. हे राष्ट्रीय कार्य असल्यामुळे संबंधित मतदारांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. यादीत ९१ हजार १८७ ‘नो फोटो व्होटर्स’ आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मोहिमेत त्यातील ५ हजार ८५३ मतदारांचा शोध लागून ३ हजार ७३ छायाचित्रे जमा झाली. उर्वरित २ हजार ७८० मतदारांनी अद्यापही छायाचित्रे दिलेली नाहीत.

मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील, अशा मतदारांची यादी जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून पडताळणीही होत आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी १९ जूनपूर्वी आपली छायाचित्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालय किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बॉक्स

पत्त्यावर न आढळणाऱ्यांबाबत पंचनामे सुरू

मतदार याद्या अद्ययावत होत आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीही देतात. मात्र, अनेकदा मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत पंचनामे करून अशा मतदारांची नावे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वगळण्यात येणार आहेत.