शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 18:48 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते  आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे.

अमरावती : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते  आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे. सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात ८९ टक्के सिडिंग झाले आहे. त्यानंतर नागरिकांची आधार ओळख पटवून रेशन मिळणार आहे.सर्वाजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अस्तित्वातील शिधापत्रिकांच्या आधारे कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक करण्याची प्रक्रिया सध्या पुरवठा विभागात सुरू आहे. यासाठीचे अर्ज रास्त भाव दुकानात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट शिधापत्रिकांना आळा बसून वितरण व्यवस्थेमधील त्रुटी निकाली निघणार आहे तसेच बायोमेट्रिक रेशनमुळे नागरिकांना नियमित स्वरूपात धान्य मिळणार आहे.योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ८२ हजार ९२३ शिधापत्रिकांवरील १९ लाख ३१ हजार २८९ सदस्यांपैकी १७ लाख २० हजार ४८१ सदस्यांचे आधार क्रमांक संलग्न करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात १८ लाख ८ हजार ७३६ सदस्यांकडे ३ लाख ८१ हजार १५१ शिधापत्रिका आहेत. यापैकी १५ लाख ८४ हजार ९१२ लाभार्थींचे सिडिंग पूर्ण झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार १४८ शिधापत्रिका व १८ लाख २४ हजार २८१ सदस्यसंख्या आहे. यापैकी १६ लाख ९ हजार ७२० सदस्यांचे आधार क्रमांक सिडिंग करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख १४ हजार ८६५ शिधापत्रिकांपैकी ९ लाख ४४ हजार ५८३ सदस्यांची नोंदणी झाली, तर वाशिम जिल्ह्यात ६ लाख ७१ हजार ८७९ सदस्यांच्या १ लाख ५१ हजार ५७७ शिधापत्रिकांवरील ८६ टक्के आधार सिडिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये ५ लाख ७८ हजार ७८ हजार ४९७ सदस्यांची आधार नोंदणी आहे.

अन्न सुरक्षा योजनेसाठीही ८७ टक्के सिडिंगशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकºयांना सवलतीच्या दरात रेशन पुरवठा करण्यात येतो. अमरावती विभागात  अन्न सुरक्षा योजनेत १४ लाख ९१ हजार ६६४ शिधापत्रिका आहेत. यामध्ये ७३ लाख ७४ हजार १२४ लाभार्थी आहेत. ८७.३१ टक्के म्हणजेच ६४ लाख ३८ हजार १९३ लाभार्थ्याचे आधार सिडिंग करण्यात आले. उर्वरित ९ लाख ३५ हजार ९३१ लाभार्थींचे संलग्नीकरण अद्याप व्हायचे आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती