शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागात उपवनसंरक्षकांच्या ८५ जागा रिक्त; प्रभारी कामकाजाने प्रशासनाची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 16:50 IST

डीएफओंची १०८ मंजूर, २३ जणांवर वनविभागाचा कारभार सुरू

अमरावती : राज्याच्या वनविभागात मंजूर १०८ पैकी उपवनसंरक्षकांची एक, दोन नव्हे तर तब्बल ८५ जागा रिक्त आहेत. एका उपवनसंरक्षकांकडे तीन ते चार जिल्ह्याचा कारभार असल्याने प्रभारी कामकाजाने वनविभागाची वाट लागली आहे. चांद्यापासून तर बांद्यापर्यंत केवळ २३ उपवनसंरक्षक वनविभागाची धुरा सांभाळत आहेत.

वनखात्याने चार वर्षापूर्वी उपवनसंरक्षकांना पदोन्नती दिली आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर तेव्हापासून नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक झाली आहे. डीएफओ नसल्याने सहायक वनसंरक्षकांकडे उपवनसंरक्षकांचा प्रभार सोपविला आहे. ही परिस्थिती जवळपास सर्वच जिल्ह्यात वनविभागात आहे. वनविभागात प्रादेशिक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभागात वर्ग १ चे पद उपवनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी पद आहे. विशेषतः बहुतांश जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाला उपवनसंरक्षक नसल्याने सहायक वनसंरक्षक हेच कारभार हाताळत आहेत.

एका अधिकाऱ्यांकडे चार ते पाच विभागाचा प्रभार असल्याने कोणत्याही विभागात व्यवस्थित कामकाज होत नसल्याची माहिती आहे. वनांचे संरक्षण, नियाेजन, वन्यजीवांची सुरक्षितता, राेपवाटिका आदींबाबतची कामे रेंगाळत आहे. वनविभागात उपवनसंरक्षक हे महत्त्वाचे पद असताना तब्बल ८५ जागा रिक्त असणे ही बाब वनसंपदा, वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने धोकादायक ठरणारी आहे. उपवनसंरक्षकांच्या रिक्त पदांमुळे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून, लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नतीची फाईल धूळखात

वनविभागात सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. नागपूर येथील वनबल भवनात एसीएफ पदांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सरळ सेवा सहायक वनसंरक्षकांना वरिष्ठ श्रेणीनुसार पदोन्नती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर आहे. मात्र गत तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. आरएफओ टू एसीएफ ही देखील पदोन्नती रखडली आहे. अशीच स्थिती कायम असल्यास ‘ प्रभारी ’ वरून वनविभागात मोठी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वन विभागात मनुष्यबळाची वानवा आहे. तथापि, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची पदोन्नती कशामुळे रखडली, याची शहानिशा केली जाईल. याबाबत लवकरच तोडगा काढून पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल.

- सुधीर मुनगंटीवार, वन मंत्री महाराष्ट्र

टॅग्स :forest departmentवनविभागjobनोकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार