शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

८४१ ग्रामपंचायतींची घरपट्टी पाणीपट्टी थकीत, ‘मार्च एडिंग’साठी ४५ दिवस बाकी, सीईओंनी नेमले वसुलीसाठी विशेष पथके

By जितेंद्र दखने | Updated: February 16, 2024 23:49 IST

बड्या व्यक्तीकडेही थकबाकी...

अमरावती : जिल्ह्यात ८४१ ग्रामपंचायतींकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीचे सुमारे ७२ कोटी ६५ लाख ८५ हजार रुपये थकीत आहेत. यामध्ये पाणीपट्टीचे ३२२५.९८, तर घर कर वसुलीचे ४१३९.८३ रुपयांची रक्कम थकीत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम ४५ दिवस शिल्लक आहेत. बहुसंख्य गावांत पदाधिकारी यांची साथ मिळत नसल्याने वसुलीत अडचण येत असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे मुदतीत वसूल करणे आता प्रशासनासमोर आव्हान आहे. काही कारभारी वसुलीत पुढे आहेत. मात्र, अनेक गावांतील पदाधिकारी व सदस्य करवसुली मोहिमेत दिसत नाहीत.

‘लोकांना नाराज केल्यास मतदानावर परिणाम होईल’, ‘कशाला वाईटपणा घ्यायचा’ म्हणून अनेक पदाधिकारी वसुलीसाठी फारसा रस घेत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी वसुलीसाठी मर्यादा येतात. गावाचा आणि ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी ‘स्वहित’ बाजूला ठेवून ग्रामपंचायतीच्या करवसुलीत पुढाकार घेण्याची गरज आहे.

बड्या व्यक्तीकडेही थकबाकीअनेक गावांत सामान्य लोक नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतात. मात्र, धनदांडगे कर वेळेवर भरत नाहीत. आजही अनेक गावांत धनदांडग्यांची वसुली थकीत आहे. ग्रामसेवक वसुलीसाठी गेल्यानंतर काही गावांत खडेबोलही ऐकावे लागत आहेत. नळजोडणी तोडल्यास वादावादीचे प्रसंग येतात. त्यामुळे वसुलीसाठी गेलेले ग्रामसेवक निराश होऊन परतात.

विस्तार अधिकाऱ्याच्या नेतृत्वात वसुली पथकजिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी व घर कर वसुलीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी विशेष शिबिर घेतले जात आहे. याशिवाय १०० टक्के कर वसुलीकरिता विस्तार अधिकारी यांच्या नेतृत्वात प्रत्येकी ३ ग्रामसेवक यांचे पथक गठित केलेले आहे. हे पथक ग्रामपंचायत क्षेत्रात जाऊन कर वसुलीची मोहीम रावबीत आहे. 

दृष्टिक्षेपात आकडेवारीएकूण ग्रामपंचायती-८४१पाणीपट्टीची थकीत रक्कम-३२२५.९८घर कर थकीत वसुली-४१३९.८३

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घर कर वसुलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक ग्रामपंचायतीत विस्तार अधिकारी यांच्या नेतृत्वात ३ ग्रामसेवकांची वसुली पथके गठित केली आहेत. याशिवाय विशेष शिबिरे राबविली जात आहेत. नागरिकांनी कर वसुलीला सहकार्य करावे.बालासाहेब बायस, डेप्युटी सीईओ, पंचायत 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTaxकर