शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

८० वर्षीय आजीने पायी गाठले ३० किमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST

देडतलाई ते धारणी प्रवास : लॉकडाऊनचा फटका धारणी : संचारबंदी आदेशामुळे वाहतुुकीच्या साधनांअभावी रविवारी ८० वर्षीय वृद्धेने देडतलाई ते ...

देडतलाई ते धारणी प्रवास : लॉकडाऊनचा फटका

धारणी : संचारबंदी आदेशामुळे वाहतुुकीच्या साधनांअभावी रविवारी ८० वर्षीय वृद्धेने देडतलाई ते धारणी हा ३० किमी प्रवास पायी केला. अगदी गलितगात्र स्थितीत ती धारणीत पोहोचली. तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या आजीला स्थानिकांनी मदतीचा हात देऊन तिचा पुढील प्रवास सुकर केला.

तालुक्यातील दिया येथील बुराई चतुरकर ही वृद्धा तिच्या मुलीच्या गावी मध्य प्रदेशातील शेखपुरा येथे गेली होती. तेथून ती रविवारी दिया गावी येण्याकरिता निघाली. तिला मध्य प्रदेशातील देडतलाईपर्यंत वाहन मिळाले. तेथून ती दियाकरिता निघाली असता, अमरावती जिल्ह्यात रविवारीय लॉकडाऊन असल्याने वाहने बंद होती. त्यामुळे ती तेथून चक्क ३० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी दुपारी धारणीत पोहचली. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी तिला स्वत:च्या वाहनाने दिया येथे पोहचवून दिले.

मध्य प्रदेशातील शेखपुरा येथे गेलेली बुराई ही वृद्धा गावाकडे रेशन व निराधार योजनेची रक्कम घेण्याकरिता दिया या मूळ गावी निघाली होती. तिला शेखपुऱ्याहून तिच्या नातेवाइकांनी बसमध्ये बसवून दिले. ती बस रविवारी अमरावती जिल्हा सीमेवर मध्यप्रदेशातील देडतलाई गावापर्यंतच आली. त्यापुढील ३० किलोमीटरचा प्रवास पायी करीत ती धारणीला आली. येथील महामार्गावरून एकटीच पायी जाणारी वृद्धा पाहून माजी नगरसेविका रेखा पटेल यांनी तिची विचारपूस केली. तिने आपबिती कथन केली. निवासाकरिता मंदिर आसपास आहे का, असे ती त्यांना विचारत होती. त्यांनी त्या आजीला पोटभर जेवण व पाणी दिले आणि शेजारी परिचित असलेल्या मनीष मोहोड या मुलाला तिला दिया गावी पोहचविण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले. त्याने लगेच धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांना घटनेची माहिती दिली. कुळकर्णी हे सामाजिक कार्यकर्ते योगेश मावस्कर यांच्यासह बुराई आजीजवळ पोहचले. त्यांनी तिला स्वत:च्या वाहनामध्ये बसवून घेतले व तिच्या गावी दिया येथे माजी सरपंच किशन पटेल यांच्या घरी पोहचवून दिले.

------------------------------