दर्यापुरात वातावरण तापले : पाच पॅनेलमध्ये तुल्यबळ लढतसंदीप मानकर दर्यापूरखरेदी-विक्री संघाच्या निवडणुक निकालाने तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय लोकांना धक्का बसला. आता बाजार समितीची निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच पॅनेलचे नेते नव्या जोमाने कामाला लागले आहेत. ३० आॅगस्ट रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीकरीता १८ जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात असून २१५४ मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.शेतकऱ्यांच्या हिताची असलेली दर्यापूर बाजार समिती जिल्ह्यातील दोन नंबरचे उत्पन्न देणारी बाजार समिती आहे. या बाजार समिती करीता पाच पॅनेल रिंगणात आहे. यामध्ये शेतकरी पॅनेल, सहकार पॅनेल, किसान पॅनेल, समात पॅनेल व सोकारी पॅनेल एकमेकासमोर उभे ठाकले आहे. बाजार समितीमध्ये सेवा सहकारी सासोयाटी मतदारसंयातून सर्वसाधाण ७, महिला राखीव २, इतर मागास प्रवर्ग १, विमुक्त जाती/भटक्या जमाती १ तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती / जमाती १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १, व्यापारी व अडते मतदारसंघात २, हमाल व तोलारी मतदारसंघात १ अशा १८ जागा निवडून द्यायच्या आहेत. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी मतदार ९५९ तर ग्रामपंचायत मतदार ६०७, व्यापारी व अडते १४५, हमाल व तोलारी मतदार ४४३ असे एकूण २१५४ मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. नुकत्याच झालेल्या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने १० जागा घेत सत्ता काबीज केली तर शेतकरी पॅनेलला ४ जागा, समता व किसान पॅनेलला ३ जागेवरच समाधान मानावे लागले. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये समता व किसान पॅनेलने युती केली होती. परंतु बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलने वेगवेगळी चूल मांडली आहे. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीपेक्षा बाजार समितीच्या निवडणुकीला जास्त महत्व प्राप्त झाल्यामुळे बाजार समिती काबीज करण्यासाठी सर्व पॅनेलचे धुरंधर रक्ताचे पाणी करून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. या निवडणुकीत जो बाजी मारेल त्यांच्यासोबतच व्यापारी व अडते व हमाल व तोलारी कोणासोबत राहायचे हे भूमिका स्पष्ट करणार आहेत. शेतकरी पॅनेलचे नेतृत्व आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार रमेश बुंदिले, बाबाराव पाटील बरबट, कुलदिप पाटील गावंडे, गंगाधरराव देवके करीत आहेत तर समता पॅनेलची धुरा बाळासाहेब वानखडे, मदन पाटील बायस्कार, मनिष कोरपे, अभिजित देवके यांच्या खांद्यावर आहे तर किसान पॅनेल अरूण पाटील गावंडे, बळवंत वानखडे, अनिल जळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या जात आहे तर सहकार पॅनेलची धुरा ज्यांनी नुकतीच खरेदी-विक्री संघात बाजी मारली ते बापुसाहेब कोरपे, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे यांच्या खांद्यावर आहे तर नव्याने या निवडणुकीत सोकारी पॅनेलचे नेते अरविंद नळकांडे व श्रीकांत तराळ यांनी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीत मतदार राजा अतिशय चाणक्य असल्याने सर्वच पॅनेलच्या नेत्यांची त्याला आपल्याकडे वळविण्यासाठी कस लागत आहे. याच निवडणुकीत कस लागत आहे. ३० आॅगष्ट रोजी मतदान होणार असून ३१ आॅगष्ट रोजी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
बाजार समितीत ८० उमेदवार रिंगणात
By admin | Updated: August 25, 2015 00:25 IST