शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात 8 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 17:23 IST

काटेरी सायाळच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लांडग्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव शेतशिवारात आठ जणांवर हल्ला केला. 

अमरावती - काटेरी सायाळच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लांडग्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव शेतशिवारात आठ जणांवर हल्ला केला. शनिवारी (21 ऑक्टोबर )पहाटे ही घटना घडली आहे. जखमींपैकी चार जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत. 

अशोक कवडू चौके (वय ३२ वर्षा ), अनिल तामखाने (वय ३७ वर्ष), वत्सलाबाई मोतीराम मुंडवाईक (वय ६५ वर्ष), संजय मोतीराम मुंडवाईक, शे. सलीम शे. करीम (वय ४६ वर्ष), दीपक प्रभाकर दिवेकर (वय ४० वर्ष), सुरेश भीमराव खडसे (वय ५५वर्ष) तसेच हनुमान भोयर (वय ६७वर्ष) व कांता भोयर अशी जखमींचं नावं आहेत.  यातील भोयर दाम्पत्यासह चौघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फुबगाव शिवारात जखमी लांडग्याने पहाटेच्या सुमारास गावात प्रवेश केला. समोर येईल त्या व्यक्तीवर हा लांडगा हल्ला करत सुटला होता. अंधार असल्याने नेमका कोणता प्राणी आहे हे ओळखता येण कठीण होतं. यामुळे दहशत वाढत गेली.   

दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तीन किलोमीटर अंतरावरील शिंगणापूर शिवारात लिंबाच्या बागेत  तिघांवर लांडग्याने हल्ला चढविला. त्यांनी मात्र या चवताळलेल्या लांडग्याला जिवंत पकडले व वनविभागाच्या ताब्यात दिले. यानंतर परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. घटनास्थळी वनरक्षक सुधीर काळपांडे, अविनाश मते, पोलीस उपअधीक्षक दिलीप सहारे, मंडळ अधिकारी मंगेश मार्कंड, प्रमोद ढवळे दाखल झाले होते. 

वनविभागाच्या अधिका-यांनी लाडंग्याला जेरबंद केल्यावर तो काटेरी सायळच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे उघडकीस आले. एक काटा त्याच्या तोंडात रुतून बसल्यामुळे तो अधिकच चवताळला. हा लांडगा बेंबळा नदीपात्रालगत  कोंडेश्वर साखर कारखान्याच्या पडीक जमिनीवरील जंगलात वास्तव्यास असावा, अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.   लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना वनविभागाच्या माध्यमातून वरित आर्थिक मदत मिळावयास हवी.  - अमोल धवस, सरपंच, फुबगाव 

लांडग्याने सायाळची शिकार करण्याचा प्रयत्न केला असावा. यामुळे सायाळचे काटे त्याच्या तोंडात व शरीरात अडकले होते. यामुळेच तो चवताळला असावा. आम्ही त्याला जेरबंद केले आहे.  - सुधीर काळपांडे,  वनरक्षक, नांदगाव खंडेश्वर