दीड महिन्याचा कालावधी : गृहभेटीवर महापालिकेचा भरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात स्वाईनफ्लूने दगावलेल्या व्यक्तींची संख्या आठवर जावून पोहोचली आहे. मागील दीड महिन्यातील हे बळी असून या कालावधीत २६ रुग्ण स्वाईनफ्लू ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले आहेत. स्वाईनफ्लूला अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गृहभेटींवर भर दिला जात आहे.महापालिका कार्यक्षेत्रात जानेवारी ते २८ मे २०१७ पर्यंत एकूण ८२ संशयित स्वाईनफ्लू रुग्णांचे नमुने घेण्यात आले. ते नागपूर आणि अन्य ठिकाणी तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यापैकी ७९ संशयित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला त्यामध्ये २६ रुग्ण स्वाईनफ्लू बाधित आढळून आले व ५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. उर्वरित ३ रुग्णांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.विलासनगर, सिद्धार्थनगर, गगलानीनगर, रोशननगर येथील रुग्णांचा स्वाईनफ्लूने मृत्यू झाल्यानंतर ती लागण रोखण्यासाठी महापालिका स्तरावर उपाययोजना व खबरदारी घेण्यात आली. तूर्तास महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूची लागण कमी आहे.दरम्यान स्वाईनफ्लूवर मात करण्यासाठी ११ एप्रिलपासून शहरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डॉक्टरांनी गृहभेटी सुरू केल्या आहेत. ११ एप्रिल ते २५ मे या कालावधीत १३ शहरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी १ ला ८३ हजार ०७१ घरांना भेटी देवून ७ लाख ३२ हजार ९०८ व्यक्तींची तपासणी केली. यात ३ हजार ४११ रुग्ण तापाचे आढळून आले. पैकी २० स्वाईनफ्लू संशयितही आढळून आलेत.२२ मे पासून पुन्हा सर्वेक्षणस्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने २२ मे पासून गृहभेटीचे पुन:सर्वेक्षण सुरू केले आहे. या कालावधीत २३,२८५ गृहभेटी देण्यात आल्या. त्यात तापाचे २५८ रुग्ण आढळून आलेत.
‘स्वाईन फ्लूचे आठ बळी; २६ पॉझिटिव्ह!
By admin | Updated: June 1, 2017 00:15 IST