शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

विदर्भ एक्स्प्रेसमधून आठ लाख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:33 IST

मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधून एका बर्थमधून रेल्वे पोलिसांनी ८ लाखांवर रोकड गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास जप्त केली. त्यापूर्वी अकोला नाका येथूनही ४ लाख २ हजार रुपये जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड जप्तीच्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

ठळक मुद्देरेल्वे पोलिसांची कारवाई : अमरावतीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर?

बडनेरा : मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधून एका बर्थमधून रेल्वे पोलिसांनी ८ लाखांवर रोकड गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास जप्त केली. त्यापूर्वी अकोला नाका येथूनही ४ लाख २ हजार रुपये जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड जप्तीच्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.विदर्भ एक्स्प्रेस गुरुवारी रात्री ८ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचताच रेल्वे पोलीस दल व रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाने एका बोगीतील बर्थ क्र. ७ वर बसलेल्या उमेश लक्ष्मण सूर्यवंशी (३०, रा. आर्वी नाका, वर्धा) या युवकाला गोपनीय माहितीवरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या तीन कार्टूनची तपासणी केली असता, त्यामध्ये ५००, २००, १०० रुपयांच्या स्वरूपात एकूण ८ लाख १० हजार रुपये आढळून आले. वर्धा येथील अशोकराज कुरियर कंपनीत तो नोकरीला असल्याचे त्याने सांगितले. ही रक्कम हवालामार्फत मुंबईला नेली जात होती. आरपीएफचे ठाणेदार राजेश बढे, रेल्वे पोलीसचे एपीआय एस.व्ही. वानखडे, पीएसआय बंडू मेश्राम, राहुल हेरोडे, राजेश नागरे यांनी ही कारवाई केली.अकोला नाका येथे कारमध्ये आढळले चार लाखबडनेरा ते लोणी मार्गातील अकोला नाका (टी-पॉइंट) येथे गुरुवारी सायकांळी अकोला, वाशीमकडून अमरावतीकडे येणाऱ्या मार्गावर टी-पॉईंट येथे वाहनांची तपासणी सुरू होती. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अकोला येथील बांधकाम कंत्राटदार नरेंद्र बळीराम पांडे (५३) व त्यांचे सहकारी मनोज के.फिलिप्स हे कार क्रमांक एमएच ३० एएफ ९०३६ ने अमरावतीकडे येत असताना भरारी पथकाने कारची झडती घेतली. कारमध्ये ४ लाख २ हजारांची रोकड आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी कार व रोकड जप्त केली. सदरची कारवाई भरारी पथकप्रमुख अक्षय लोहार, पोलीस उपनिरीक्षक संजय आत्राम, विजू गैरवार आदींच्या पथकाने केली. लोकसभेच्या अमरावती मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. शहराच्या आठ सीमांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे.मोठ्या प्रमाणात रोकड पकडली जात असल्यामुळे येथील लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा सर्रास वापर होत असल्याचे स्पष्ट होते. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तपासणी नाक्यांची संवेदनशीलता आणि क्षमता अधिक वाढविणे इष्ट ठरेल.

टॅग्स :Policeपोलिस