अंतिम मतदार यादी प्रसिध्द : निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षाअमरावती : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांनी आक्षेपांच्या सुनावणी अंती सात हजार ९५५ मतदार संख्येवर निश्चीती केली आहे. अंतिम मतदार यादीत प्रसिद्धीनंतर निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेने शिक्षक मतदारसंघातून ६ हजार ५८० आणि जिल्हा परिषद कर्मचारी मतदार संघातून १ हजार २९८ मतदारांची प्रारुप यादी सहकार विभागाला सादर केली होती. यानुसार प्राप्त यादीतील नाव नसलेले, नावात दुरुस्ती, बदलीनंतर तालुक्याची दुरुस्ती, थकबाकीसह कर्जाचा भरणा न केलेले थकबाकीदार आदीबाबत आक्षेप घेण्यात आले होते. जिल्हा निबंधक गौतम वालदे यांनी २१ सप्टेंबरला त्या आक्षेपांची सुनावणी घेतली. त्यानंतर आता अंतिम यादीत शिक्षक मतदार संघात ६ हजार ६१६ तर कर्मचारी मतदार संघात १ हजार ३३९ मतदार आहेत. विशेष म्हणजे प्रारुप यादीत ७ हजार ८७८ मतदारांची नावे होती त्यामध्ये ७७ मतदार वाढले अहेत. मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीनंतर साधारणपणे आॅक्टोबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
शिक्षक बँक निवडणुकीसाठी ७ हजार ९५५ मतदार
By admin | Updated: September 25, 2015 01:01 IST