शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

परतवाड्यातील सराफा दुकानात ७८ लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:08 IST

शहरातील सदर बाजार स्थित ईश्वर पन्नालाल ककरानिया (अग्रवाल) यांचे सराफा दुकान फोडून चोरांनी सुमारे ७७ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी २ किलो ५८ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी, तीन हजार रुपये रोख व सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला.

ठळक मुद्देअडीच किलो सोने, चांदी लंपास : कटरने तोडली कुलपे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील सदर बाजार स्थित ईश्वर पन्नालाल ककरानिया (अग्रवाल) यांचे सराफा दुकान फोडून चोरांनी सुमारे ७७ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी २ किलो ५८ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी, तीन हजार रुपये रोख व सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला.चोरांनी दुकानाला लागलेली १० कुलपे कटरने तोडली. सराफा दुकानात प्रवेश करून पाच तिजोऱ्या उघडण्याचा प्रयत्न केला. यात लहान तिजोरी त्यांच्याकडून उघडली गेली. या तिजोरीतील लोकांनी गहाण ठेवलेले जवळपास ७७ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने पिशवीत भरून चोर निघून गेलेत. सदर बाजार वर्दळीचे ठिकाण आहे. यातच श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंतही सदर बाजार जागीच होता. असे असताना भरवस्तीत ही चोरी झाली. ज्या चारचाकी वाहनाने चोर आलेत, त्याच वाहनाने ते पसार झालेत. दुकानाशेजारी असलेले एक दोन जण लघुशंकेकरिता उठले असता, त्यांना आवाज आला. त्यांना चोर कारमधून पळून जाताना दिसलेत. याची माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झालेत. पोलीस विभागातील वरिष्ट अधिकारीही घटनास्थळी दाखल झालेत. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञही पोहोचलेत. पोलिसांचे एक पथक चोरांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.पोलिसांपुढे आव्हानपरतवाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर या जबरी चोरीमुळे परत एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. यापूर्वी ६ मे रोजी विवेक अग्रवाल यांच्या घरी पडलेल्या दरोड्याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. या दरोड्यात चोरांनी २० लाख ७८ हजारांचा माल लंपास केला होता. यानंतर १८ जुलैला शहरात एकाच दिवशी चोरांनी पाच दुकाने फोडलीत. यानंतर २३ जुलैला पहाटे एक कृषिसेवा केंद्र फोडले. ६ मे रोजीच्या दरोड्यासह अन्य या दुकानफोडीतील आरोपी पोलिसांना अजूनपर्यंत गवसलेले नाहीत. यातच रविवारच्या सराफा दुकानफोडीमुळे ‘पोलीस सुस्त चोर मस्त’चा प्रत्यय नागरिकांना आला आहे.शहरातील व्यावसायिक वर्तुळामध्ये चोरीच्या मालिकेमुळे प्रचंड दहशत पसरली आहे.बेवारस कार आढळलीपरतवाडा येथील व्यापारी प्रतिष्ठाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाºया आरोपींनी गुन्ह्यात कारचा वापर केला. रविवारी सकाळी अमरावतीच्या अ‍ॅकेडमिक ग्राऊंड परिसरात एमएच २९ आर १५६९ या क्रमांकाची कार बेवारस स्थितीत आढळून आली. हीच कार परतवाड्यात सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ती २४ आॅगस्ट रोजी असीर कॉलनीतून चोरी गेली होती.एकाच रात्री पाच दुकाने फोडलीसदर बाजार स्थित ईश्वरदास पन्नालाल अग्रवाल यांचे सराफा दुकान फोडतानाच २५ आॅगस्टला पहाटे परतवाडा शहरातील गुजरी बाजार स्थित केडिया किराणा दुकान, जयस्तंभवरील खंडेलवाल कृषी केंद्र आणि अचलपूर रोडवरील अनंत मेडिकल्स चोरट्यांनी फोडले. यात खंडेलवाल कृषिसेवा केंद्राचे तीन कुलूप तोडून १ हजार १० रुपये रोख चोरांनी पळविले. रवि गुप्ता यांच्या अनंत मेडिकल्समधून दहा हजार रुपये रोख व डीव्हीआरही पळवून नेला. गुजरीबाजार स्थित केडिया किराणा स्टोअर्समधून कुलूप तोडून ५ ते १० हजारांची, तर बाजूलाच असलेल्या केडिया जनरल स्टोअर्समधूनही कुलूप तोडून ५ ते १० हजार लंपास केलेत. एकाच रात्री पाच दुकाने फोडण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी १८ जुलैला चोरांनी याच पद्धतीने पाच दुकाने फोडली होती. या घटनांच्या अनुषंगाने वृत्त लिहिस्तोवर दुपारी सव्वा वाजेपर्यंतही पोलीस काही माहिती द्यायला तयार नव्हते. स्टेशन डायरी गुन्हा दाखल नसल्याचे सांगत होते, तर ठाणेदार राजेंद्र पाटील गुन्हा दाखल झाल्यानंतर स्टेशन डायरीवरून माहिती घेण्याचा सल्ला देत राहिले. दरम्यान, एसडीपीओ अब्दागीरे परतवाडा पोलीस ठाण्यात तळ ठोकून असून, सराफा दुकानदारांच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Thiefचोर