शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ७७.२४ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:16 IST

संदीप मानकर, अमरावती : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन ...

संदीप मानकर, अमरावती : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन प्रकल्पात सरासरी ७७.२४ टक्के पाणीसाठा साचला आहे. अनेक मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८४.१२ टक्के पाणीसाठा साचल्याने या महिन्यात कोसळणाऱ्या परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२५ मध्यम, नऊ मोठे व ४७७ लघू अशा एकूण ५११ सिंचन प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा २५३६.११ दलघमी असून, त्याची सरासरी टक्केवारी ही ७७.२४ टक्के आहे. १० सप्टेंबरपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील आणखी पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बॉक्स :

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

जलसंपदा विभागाने दिलेल्या ५ सप्टेंबर रोजीच्या पाणीसाठ्याच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ८६.१९ टक्के पाणीसाठा साचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प हा १०० टक्के भरला. या प्रकल्पातून ४४ सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अरुणावती प्रकल्पात ९६.३३ टक्के, तर बेंबळा ८६.७५ टक्के पाणीसाठा साचला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९४.४४ टक्के, वान प्रकल्पात ८२.३९ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात फक्त २७.४४ टक्के पाणीसाठा असून पेनटाकळी प्रकल्पात ४०.६९ टक्के साठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ९०.६७ टक्के पाणीसाठा असून तीन गेट उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून १० सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे.

बॉक्स :

आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरी

विभागातील आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून अनेक प्रकल्प शंभरीच्या वाटेवर आहेत. शंभर टक्के प्रकल्प भरणाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, तर अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी व उतावली प्रकल्पाचा समावेश आहे.