शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

७७ कोटी जाणार परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:14 IST

शासनाने अखर्चित निधी परत मागितल्यानंतर जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ...

जिल्हा परिषदेत ४० कोटी जमा : विकास निधी नसल्याची वित्त सभापतींची स्पष्टोक्तीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने अखर्चित निधी परत मागितल्यानंतर जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या सन २०१० ते २०१५-१६ पर्यंतचा विविध विभागांतील ७७ कोटी ७ लाख ५६ हजार ६२२ रूपयांचा विकासकामांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे. याशिवाय वेतनामधील २४ कोटी ७७ लाख १६ हजार ९८८ रूपये असा जवळपास एकूण ११० कोटींचा निधी शासनाला परत केला जाणार आहे. जो निधी शासनाकडे परत गेला तो निधी विकास कामांचा नसून वेतन आणि वेतन्नोत्तरमधील असल्याची स्पष्टोक्ती सभापती बळवंत वानखडे यांनी दिली. राज्य शासनाने ३० जून अखेर जिल्हा परिषदेकडे अखर्चितरित्या पडून असलेला निधीची माहिती मागविली होती. झेडपी प्रशासनाकडून झालेल्या पडताळणीत सर्व विभागाच्या हिशेब जुळवणीत ११० कोटीची रक्कम परत करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या खात्यात खडखडाट होण्याचे निश्चित झाले आहे. अखर्चित निधीपैकी ४० कोटी रूपये जमा केले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी निधी दिला जातो. हा निधी ज्या वर्षात दिला जातो, त्या वर्षासह लगतच्या आर्थिक वर्षात खर्च करण्याची संधी दिली जाते; मात्र काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो.आता राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विकास कामांसाठी दिलेला; मात्र अद्यापही अखर्चित असलेला निधी शासन परत घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वच महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदांकडून जून २०१७ अखेर विकासकामांचा किती निधी अखर्चित आहे, याची माहिती शासनाने मागविली. शासनाच्या पत्रानुसार त्यानुसार जो निधी विहीत मुदतीत खर्च झाला नाही. असा मागील काही वर्षातील हा निधी शिल्लक होता.त्यामुळे तो परत गेला आहे. अर्धवट असलेली विकासकामे पूर्ण झाल्यानंतर निधी मिळणार आहे.आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार निधीशासनाकडून ज्या योजनेसाठी निधी मिळाला तो निधी विहित मुदतीत खर्च झाला नाही तर प्रथमता शासन दरबारी जमा करावा लागतो. त्यानंतर योजनेच्या कामाचा आढावा घेऊन त्यात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शासनाकडे त्या विभागाचे सचिवांनी अशा कामांचा आढावा घेऊन संबंधित विभागाकडे मागणी केल्यानंतर निधी उपलब्ध करून दिला जातो. वेतनासाठी जो निधी उपलब्ध होतो त्यामध्ये जो निधी शिल्लक राहतो तोच निधी शासनाकडे परत केला जातो. त्यापैकीच आतापर्यंत २४ कोटी रूपये शिल्लक होते.असा आहे परत केलेला निधीजिल्हा परिषदेचे बांधकाम १० कोटी ८४ हजार, लघुसिंचन १ कोटी ७६, लाख ३६ हजार ६१९, पाणीपुरवठा ४६ लाख ८ हजार ३३९, पशुसंवर्धन २ लाख १४ हजार ५९३, शिक्षण १ कोटी ४६ लाख २२ हजार, आरोग्य २९ लाख ४५ हजार ६९९, पंचायत ४ कोटी ३४ लाख ९८ हजार २६०,कृषी, १० हजार ८००, महिला व बालकल्याण २ कोटी १३ लाख ३७ हजार ८५०, समाजकल्याण ५६ कोटी ५७ लाख ९८ हजार ४६२ या विभागाचा असलेला अखर्चित निधी ७७ कोटी रुपयांपर्यंत आहे.