शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य संवर्धनासाठी मेळघाटात झटणार ७६ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

धारणी : कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणाद्वारे १० ते १७ जूनपर्यंत झोन ...

धारणी : कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणाद्वारे १० ते १७ जूनपर्यंत झोन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दक्षतापूर्वक हा कार्यक्रम पार पाडण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिले आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध राहावा तसेच कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी व्हावी, यासाठी मेळघाटात नियमित सर्वेक्षण, संपर्क व उपचार यासाठी काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. झोन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

झोन कार्यक्रमासाठी ७६ पथके गठित करण्यात आली आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. झोन कार्यक्रमात अंगणवाडीमध्ये जाऊन वजन घेणे, नंतर त्या बालकाचे ग्रेडेशन ठरवून सॅम व मॅम बालकांचे संनियंत्रण व उपचार केले जातात. ज्या बालकांना केंद्रात भरती करण्याची गरज आहे, अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानंतर दाखल करण्यात येऊन त्यांना आवश्यक उपचार मिळवून दिले जातात. गरज पडल्यास उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय येथून जिल्हा रुग्णालय येथे संदर्भ सेवा दिली जाते, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.

बॉक्स १

आरोग्यविषयषक कार्यक्रमांची अंमलबजावणी

गरोदर माता तपासणी, स्तनदा माता तपासणी प्रतिबंध, उपचार व संदर्भ सेवा देऊन मातामृत्यू कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. कुपोषित बालकांची तपासणी, दुर्धर आजारी बालकांची तपासणी, कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरिया, गलगंड, सिकलसेल आदी आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी या कार्यक्रमामध्ये केली जाते.

पाणीपुरवठ्यावर लक्ष

पाणी नमुने घेऊन ते तपासणीस पाठविले जातात. गावातील पिण्याच्या पाण्याचे सर्वेक्षण केले जाते व जिथे लिकेज आढळले किंवा पिण्याच्या पाण्याचा टाकीच्या काही समस्या असल्यास, त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायतमार्फत केला जातो. गावातील वृद्ध व्यक्ती असल्यास किंवा ज्यांना मोतीबिंदू आढळला, त्यांची तपासणी व संदर्भ सेवा दिली जाते. विविध योजनांचा पाठपुरावा करून लाभार्थाींच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आरोग्यविषयक कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे यांनी दिली.

यांच्याकडे आहे सुकाणू

चिखलदऱ्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश प्रधान व धारणीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री नवलाखे यांनी नियोजन केले आहे. पथकांना नागरिकांनी योग्य माहिती द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी केले आहे.