शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

७४८ कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन !

By admin | Updated: April 29, 2016 00:09 IST

खरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती ...

३० एप्रिल 'डेडलाईन' : १ लाख ७ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती व सहकारी पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय २६ एप्रिल रोजी शासनाने घेतला. या निर्णयाचा जिल्ह्यामधील १ लाख ६ हजार ६९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यांच्या ७४८ कोटी १६ हजाराच्या पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे. खरीप पीककर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांना ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करुन यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. खरीप पीककर्जाच्या परतफेडीचा ३१ मार्च हा कालावधी असल्याने जिल्ह्यातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असणाऱ्या १९६७ गावांमधील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकरणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात पुनर्गठन करण्याचे निर्देश आहेत. पाच वर्षांसाठी पुनर्गठनअमरावती : सन २०१६ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७८ हजार ४७६ शेतकऱ्यांना १४२३५८.५२ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा बँकेने ५६३२७ शेतकऱ्यांना ३८९७०.५२ लाखांचे कर्जवाटप केले होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी ११८६८४ शेतकऱ्यांना १००३३६.०० लाखाचे व ग्रामीण बँकांनी २४०३ शेतकऱ्यांना २२६८.०० लाखाचे कर्जवाटप केले होते. यापैकी जिल्हा बँकेच्या ३४९२२ शेतकरी सभासदांनी २६५६१.२९ लाखांचा ३१ मार्च २०१६ अखेर कर्जाचा भरणा केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३५६०५ शेतकऱ्यांनी ४००७५.०० लाखांचा व ग्रामीण बँकांच्या ३५९ शेतकरी सभासदांनी २६७.०२ लाखांच्या कर्जाचा भरणा केला आहे.३१ मार्च २०१६ अखेर पीककर्जाची शिल्लक बाकी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या २१४०५ शेतकरी सभासदांचे १२४०९.२३ लाखाचे व राष्ट्रीयकृत बँकांच्या ८३०७९ शेतकऱ्यांना ६०२६१.०० लाख व ग्रामीण बँकेच्या ७०३ शेतकरी सभासदांच्या ५४१.९३ लाख व खासगी बँकांच्या १६८२ शेतकरी सभासदांच्या १५८८.०० कोटींच्या पीककर्जाचे शेतकऱ्यांच्या संमतीने ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे.राज्य शासनाने कर्जाचे पुनर्गठन करून शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे सतत नापिकी, दुष्काळात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याचे हे संकेत आहे. बँकाना हे आदेश लागू करण्यात आल्याने विंवचनेत असलेला शेतकरी काही अंशी संकटातून सावरणार आहे.यंदा २६२.६९ कोटींचे पीक कर्जवाटपचालू वर्षी जिल्ह्यात सन २०१६-१७ करीता जिल्हा बँकेला ६९६.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना १४३६.९३ कोटी व ग्रामीण बँकांना १२ कोटी असा एकूण २१४५.६८ कोटींच्या पीक कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. २२ एप्रिल २०१६ अखेर जिल्हा बँकेने २७३४१ शेतकऱ्यांना २३२.५७ पीककर्जाचे वाटप केले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३४८० शेतकऱ्यांना ३०.१२ कोटी असे एकूण ३०८२१ शेतकऱ्यांना २६२.६९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.