शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
5
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
7
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
8
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
9
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
10
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
11
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
12
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
13
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
14
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
15
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
16
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
17
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
18
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
19
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

७४७ पॉझिटिव्हचे नाव, पत्ते चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग चाचण्याला सुरुवात झाली.  या आजाराविषयीचे गैरसमज व भीतीमुळे अनेक संशयित स्वॅब देण्यास कचरत होते. त्यावेळी मोबाईलवर ओटीपी येत असल्याने हा क्रमांक बरोबर असला तरी अनेकांनी चुकीचे नाव व पत्ता दिल्याने त्यांना शोधतांना यंत्रणेची चांगलीच कसरत झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. काहिंना तर चक्क पोलिसांच्या मदतीने उपचारार्थ दाखल करावे लागल्याचे सांगण्यात आले.    पॉझिटिव्ह

ठळक मुद्देसात महिन्यातील स्थिती : अनेक फोन नंबरही राँग, यंत्रणांचीही तारांबळ

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना संसर्गाच्या अधिकाधिक चाचण्या होऊन कोरोनाग्रस्तांवर त्वरेने उपचार व्हावा, यासाठी प्रशासनाचे  प्रयत्न सुरू आहे. मात्र,  सात महिन्याच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात तब्बल ७४७ व्यक्तींनी स्वॅब देताना नाव, पत्ता व फोन क्रमांक चुकीचे दिले आहेत. या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली.  जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग चाचण्याला सुरुवात झाली.  या आजाराविषयीचे गैरसमज व भीतीमुळे अनेक संशयित स्वॅब देण्यास कचरत होते. त्यावेळी मोबाईलवर ओटीपी येत असल्याने हा क्रमांक बरोबर असला तरी अनेकांनी चुकीचे नाव व पत्ता दिल्याने त्यांना शोधतांना यंत्रणेची चांगलीच कसरत झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. काहिंना तर चक्क पोलिसांच्या मदतीने उपचारार्थ दाखल करावे लागल्याचे सांगण्यात आले.   पॉझिटिव्हच्या परिवारातील अनेकजण एकाचवेळी स्वॅव द्यायला येतात, त्यामुळे एखाद्याचे नाव चुकीचे असले तरी त्याच्या अगोदर किंवा नंतरच्या व्यक्तीच्या साहाय्याने पॉझिटिव्ह ओळखण्याची कला आता आरोग्य यंत्रणेला अवगत झालेली आहे. काहींची नावे अर्धवट असल्याने स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनीही संक्रमित रुग्ण शोधण्यास मोलाची मदत केली. मात्र, या लपाछपीच्या खेळात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे अनेकांना संसर्ग होणे याशिवाय उशीराने उपचार मिळाल्याने प्रकृती गंभीर होण्याचे प्रकारदेखील घडले आहेत.सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक महापालिका क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात सात हजारांवर रुग्णांची नोंद झाली. या महिन्यात ४०० वर पॉझिटिव्हनी स्वॅव देताना नाव व पत्ता चुकीचा सांगितल्याने त्यांचा शोध घेताना आरोग्य यंत्रणेची दमछाक झाली. काहीचे पूर्ण नाव नाही. किंवा त्यांचा पत्ता मोघम लिहिल्यामुळे एकढ्या मोठ्या नगरात त्याला व्यक्तीला शोधणे म्हणजे ढिगाऱ्यात सुई शोधण्यासमान ठरलेे, 

ओळख लपविण्यासाठी अन्य जिल्ह्यातील व्यक्तीही जिल्ह्यातजिल्ह्यात गावाच्या नावाने ओळखल्या जाऊ याशंकेने अकोला वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी अमरावती जिल्ह्यात येऊन कोरोना संसर्गाचे नमुने तपासून व अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेद्वारे फोन केला असता संबंधित व्यक्ती जिल्ह्याबाहेरचा असल्याचे स्पष्ट झाल्याने तेथील आरोग्य यंत्रणेस कळविणे आदी सोपस्कार करावे लागले. अनेकांनी मोबाईल नसलयाचे कारणे दर्शवीत अन्य परिचीतांचे नंबर दिल्यानेही गोंघळ उडाला आहे.

 

स्वॅब देतेवेळी मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो. त्यामुळे हा क्रमांक बरोबर असतो, काही व्यक्तींची नावे व पत्ता चुकीचा आढळला. मात्र, परिवारातील अन्य एक मोबाईल क्रमावरून त्यांचा शोध घेऊन उपचारार्थ दाखल करण्यात आले.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

 संसर्ग काळात आतापर्यंत ७४७ पॉझिटिव्ह व्यक्तींचे नाव, पत्ता व फोन नंबरमध्ये त्रुटी आढळून आल्यात. त्यांना शोधणे व उपचारार्थ दाखल करण्यासाठी पथकाला खूप परिश्रम लागलेत. दोम-चार कोसेसमध्ये पोलिसांचीही मदत घेण्यात आली.- डॉ विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या