शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर उपविभागात पोलीस पाटलांची ७४ पदे रिक्त

By admin | Updated: April 18, 2015 00:11 IST

शासनाचा शेवटच्या घटकांतील महत्त्वाचा आधार समजले जाणाऱ्या पोलीस पाटलांची तब्बल ७४ पदे रिक्त असल्याने या गावाचा कारभार मागील तीन वर्षांपासून पोलीस पाटलांविनाच सुरू आहे.

जूनमध्ये भरणार पदे : ग्रामपंचायत निवडणूक पोलीस पाटलांविनाचधामणगाव रेल्वे : शासनाचा शेवटच्या घटकांतील महत्त्वाचा आधार समजले जाणाऱ्या पोलीस पाटलांची तब्बल ७४ पदे रिक्त असल्याने या गावाचा कारभार मागील तीन वर्षांपासून पोलीस पाटलांविनाच सुरू आहे. परिणामी ‘गाव तंटामुक्त अभियाना’चा फज्जा उडाला आहे़ तर तीन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका पोलीस पाटलांच्या मदतीशिवाय होत आहेत.राज्य शासनाच्या महसूल विभागाने दोन तालुके मिळून एक उपविभाग एक वर्षापूर्वी राज्यात केला असला तरी चढाओढीच्या राजकीय स्थितीमुळे तीन तालुक्यांचा चांदूररेल्वे उपविभाग अस्तित्वात आला आहे़ तिवसा तालुका वगळून नांदगाव खंडेश्वर तालुका चांदूररेल्वे उपविभागाला जोडण्यात आला आहे़ आतापर्यंत लोकसभा, विधानसभा तसेच दोन तालुक्यातील पंचायत समिती निवडणुका पार पडल्या. परंतु आदर्श आचारसंहितेमुळे पोलीस पाटलांची पदे भरण्यात आली नाहीत.नांदगावात ३४ गावांना पोलीस पाटलांची प्रतीक्षानव्याने चांदूररेल्वे उपविभागाला जोडण्यात आलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३४ गावे पोलीस पाटलापासून अनेक दिवसांपासून अलीप्त आहेत़ पहूर, गावनेर तळेगाव, दारापूर, सातरगाव, चांदसुरा, नागझिरी, टाकळी कानडा, धानोरा शिखरा, मोरगाव, जगतपूर, पिंपरी पोच्छा, वरूडा, पिंपळगाव बैनाई, ढेगांडा, रसुलपूर, हरनी, निमगव्हाण,फूल आमला, म्हसला, निरसाना, जामगाव, वाटपूर, कोहळा, सुकळी गुरव, वाघोली, शिंगोली, साखरा, पळसमंडळ, एकलारा बीड, माहुली चोर, सिध्दनाथपूर, धानोरा फसी, इंजाळा, पाचोड या गावांमध्ये अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. मात्र आता मागणी होत आहे.धामणगावात २१ पदे रिक्तपोलीस पाटलांची तब्बल २१ पदे धामणगाव तालुक्यात रिक्त आहे़ ही गावे पोलीस पाटलापासून वंचित आहे़ निंबोली, सोनोरा काकडे, निंभोरा बोडका, सावळा, गंगाजळी, परसोडी,शेंदूरजना खुर्द, वरूड बगाजी, जळका पटाचे, महिमा पूर, खरडा, बोरवघड, नायगाव, वाढोना, ढाकुलगाव, कामनापूर घुसळी, तुळजापूर सोनेगाव खर्डा, वसाड, आष्ट, कळाशी या गावात पोलीस पाटील पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. चांदूररेल्वेत १८ गावांना हवे पोलीस पाटील चांदूररेल्वे तालुक्यातील एक वर्षापासून १८ गावे पोलीस पाटलांविना आहेत़ इस्माईलपूर, कळमगाव, ब्रम्ही, मांजरखेड कसबा, सोनगाव, हडप्पा, दिघ्घी कोल्हे, आमला, थूगाव, बग्गी, खानापूर, जवळा, खरबी माणिक धोत्रा, मांजरखेड दानापूर, सालोरा खुर्द, सावंगी मग्रापूर, धानोरा मोगल या गावांना पोलीस पाटील देणे अतिशय गरजेचे आहे़चांदूररेल्वे उपविभागातील ७४ पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. मध्यंतरी ही पदे भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर स्थगनादेश होता़ त्यानंतर प्रशासकीय कार्यवाही वेगाने झाली. परंतु लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती या निवडणुका पाठोपाठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. आदर्श आचारसंहितेमुळे या गावांतील पोलीस पाटलांची पदे भरण्यात आलेली नाहीत़ याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती कळविण्यात आली आहे़ या गावांचा पदभार सध्या शेजारच्या गावांतील पोलीस पाटलांकडे देण्यात आला असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था व्यवस्थितपणे सांभाळली जात आहे़-नितीन व्यवहारे,उपविभागीय अधिकारी, महसूल विभाग, चांदूररेल्वे.