शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७३९ शाळा झाल्या डिजिटल

By admin | Updated: May 15, 2017 00:18 IST

: शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील १ हजार ६०२ शाळांपैकी ७३९ शाळा मार्च अखेरपर्यंत डिजिटल झाल्या आहेत.

हातभार : सर्वच शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट, शिक्षण विभागाचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील १ हजार ६०२ शाळांपैकी ७३९ शाळा मार्च अखेरपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. शाळांमध्ये अध्यापन करताना डिजिटल साधनांचा वापर झाल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयीची गोडी वाढेल. त्याचबरोबर शिकताना त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर शाळांमध्ये शिकविताना जास्तीत जास्त शैक्षणिक साधने व डिजिटल साधनांचा वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील सर्वच १ हजार ६०२ शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने दिले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले असून ग्रामपंचायतीची मदत, लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळांनी निधी गोळा करीत जिल्ह्यातील ७३९ शाळा डिजिटल केल्या आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी संबंधित शाळेला एलईडी टीव्ही किंवा अ‍ॅन्ड्रॉईड मॅग्नेफाईन ग्लास, मायक्रो कॉस्ट डिव्हाईस, प्रोजेक्टर आदी साधने खरेदी करावे लागतात. शाळेला डिजिटल करण्यासाठी किमान २५ हजार ते जास्तीत जास्त ८५ हजार रूपयांपर्यंत खर्च येतो. प्रत्येक वर्ग डिजिटल करण्याचे उद्दिष्ट असले तरी हे उद्दिष्ट इतक्या लवकर पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम शाळेतील किमान एक वर्ग डिजिटल करण्याकडे विशेष भर दिला जात आहे. शाळा डिजिटल झाल्यास अध्यापनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर डिजिटल साधनांचा वापर करून मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविता येणार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यास मदत होईल. कमी पटसंख्या असलेल्या शाळेला मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास व साऊंड वापरून शाळा डिजिटल करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शाळाही लवकरच डिजिटल करण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. १४ व्या वित्त आयोगातून कायापालटग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीत डिजिटल वर्गखोल्यांचा उल्लेख असल्याने त्यातून ग्रामपंचायतींनी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम तयार करणे आवश्यक आहे. अनेक ग्रामपंचायतींनी याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.तालुकानिहाय डिजिटल वर्गखोल्याअमरावती ८२, अचलपूर ३३, अंजनगाव सुर्जी ४१, चांदूररेल्वे ४६, भातकुली २२, चांदूरबाजात १९, चिखलदरा १३६, धारणी ११५, दर्यापूर ९२, मोर्शी २६, धामणगाव रेल्वे ३७, तिवसा २०, नांदगाव खंडेश्वर ५१, वरूड १९ अशा एकूण ७३९ वर्ग खोल्या डिजिटल झाल्या आहेत.सर्वशिक्षा अभियान, पेसा, १४ वा वित्त आयोग व इतर योजनांच्या माध्यमातून डिजिटल क्लासरूमचे काम जिल्हाभरात सुरू आहे. याशिवाय शासनाने रोटरी संस्थेशीही करार केला आहे. अशा विविध योजनांमधून डिजिटल वर्गाचे काम सुरू आहे. यामुळे भविष्यात सर्व शाळा डिजिटल केल्या जातील. - एस.एम.पानझाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक