शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ७.२५ कोटींची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:56 IST

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री, तीन आमदार आणि सत्तासमर्थक खासदार असतानाही विरोधी पक्षातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याच्या मुद्याची अनेक गावांत उपस्थितांनी विशेष दखल घेतली.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : व्यायामशाळा, समाजमंदिर, सभागृहांची भूमिपूजने

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी रविवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन केले. सुमारे ७ कोटी २५ लाख रुपये खर्चून होणाऱ्या या विकासकामांमुळे या गावांचा चेहरामोहरा बदलणार आहे.भूमिपूजनाला सामाजिक उपक्रमांची जोड देत आ. जगताप यांनी गिलबा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथे वृक्षारोपण केले. जनसुविधा, आमदार निधी, विशेष निधी, लेखाशीर्ष ३०५४, व्यायाम शाळा, सिमेंट रस्ते, नाली, समाज मंदिर, प्रवासी निवारा, पुतळा सौंदर्यीकरण आदी कामांचे भूमिपूजन केले.मतदारसंघातील कोदोरी, शिंगोली, टाकळी कानडा, टाकळी गिलबा, धानोरा फसी, जयसिंगा, शेलुगुंड, वाटपूर, सिद्धनाथपूर, निमसवाडा या गावी लोकपयोगी कार्यासंबंधीचे कार्यक्रम पार पडताना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री, तीन आमदार आणि सत्तासमर्थक खासदार असतानाही विरोधी पक्षातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याच्या मुद्याची अनेक गावांत उपस्थितांनी विशेष दखल घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, विनोद चौधरी, दीपक सवाई, जयश्री कोहचडे, वैशाली रिठे, अनिता अडमते, रणजित मेश्राम, आशाताई सोनवणे, दिनेश केने, अरुण भगत, कल्पना घाटे, शकुंतला चक्रे, सुनील जैन, शीतल पारवे आदींची उपस्थिती होती.येथे होणार विकासकामेकोदोरी येथे शाळा खोली, व्यायामशाळा, स्मशानभूमी रस्ता व शेड, शिंगोली येथे मुख्य रस्त्याचे बांधकाम, टाकळी कानडा येथे भगवान गौतम बुद्ध पुतळा सौंदर्यीकरण, काँक्रीट रस्ता, स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण, टाकळी गिलबा येथे समाजमंदिर बांधकाम, टाकळी गिलबा ते कोव्हळा रस्त्यावरील पूल, धानोरा फसी-सार्सी, कोठोडा- माहुली चोर, सावनेर रस्त्यावर प्रवासी निवारा, शेलुगुंड स्मशानभूमी वॉल कंपाऊंड, जयसिंगा स्मशानभूमी पोचरस्ता, वाटपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण, पाण्याची टाकी ते गुरांच्या कोंडवाड्यापर्यंत, कब्रस्तानला चेनलिंक, फेन्सिंग, सिद्धनाथपूर अंतर्गत रस्ता व निमसवाडा येथील काँक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास