शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अचलपूर उपविभागात ७२ रोहित्र निकामी

By admin | Updated: October 29, 2014 22:41 IST

वेळेत विजेची देयके आली नाहीत तर वीज खंडित करणारी वीज वितरण कंपनी घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात मात्र अपयशी ठरली आहे. एकट्या अचलपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत

सुरेश सवळे - चांदूरबाजारवेळेत विजेची देयके आली नाहीत तर वीज खंडित करणारी वीज वितरण कंपनी घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात मात्र अपयशी ठरली आहे. एकट्या अचलपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत तब्बल ७२ रोहित्र निकामी झाले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात हा आकडा १४० वर गेला आहे. कंत्राटदाराची मनमानी आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे शिरजगाव कसबा परिसरातीील शेतकरी त्रस्त झाले आहेत. यात त्यांचे लाखोंचे नुकसान ङोत आहे. या त्रासाला कंटाळून शिरजगाव कसबा येथील नंदू पेठे या शेतकऱ्याने तर अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याची नोटीस वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना १३ आॅक्टोबर रोजी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनोहर सुने यांनी ‘लोकमत’ला दिली. आ. बच्चू कडून यांनी वीज वितरण कंपनीविरूध्द एल्गार पुकारला असून १ नोव्हेंबरनंतर केव्हाही अचलपूर उपविभागातील कोणतेही विद्युत कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचे रोहित्र निकामी झाल्यानंतर त्याची तक्रार संबंधित कार्यालयात केल्यानंतर एक-एक महिना रोहित्र बदलून देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. तीच अवस्था घरगुती मीटरची आहे. ‘फॉल्टी मीटर’बदलून देण्यासही साहित्याची अडचण दाखवून ही तक्रार प्रलंबित ठेवली जाते. शिरजगाव कसबा विद्युत कार्यालयात तर अनेक महिन्यांपासून कनिष्ठ अभियंत्यांची ५६ पदे रिक्त असल्यामुळे विद्युत ग्राहकांना सेवा मिळत नाही. नादुरूस्त अवस्थेतील रोहित्र बदलून दिल्यानंतरही त्याचा टिकाऊपणा संशयास्पद असल्याचे बोलले जाते. थूगाव मार्गावरील रोहित्र जून २०१४ मध्ये चोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे रोहित्र बसविण्यात आले खरे. मात्र ते दोन महिन्यातच पुन्हा निकामी झाले.हीच अवस्था शिरजगाव कसबा पॉवर स्टेशनवरून अंगदपूर फिडरमध्ये होणाऱ्या अनियमित विद्युत पुरवठ्याबाबत आहे. याबााबत शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यांना अनेक निवेदने दिली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनोहर सुने यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.