शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

७१ वर्षीय आशाबाईने केले महाराष्ट्राचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:25 IST

बंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करून तिसऱ्या स्थानावर आणण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या येथील ७१ वर्षीय आशाबाई शिरसाट यांना येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स क्रीडा सचिव डोमिनिक सॅव्हिओ यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २७, २८ फेब्रुवारी रोजी पाडली.

ठळक मुद्देआॅल इंडिया अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धा

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : बंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करून तिसऱ्या स्थानावर आणण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या येथील ७१ वर्षीय आशाबाई शिरसाट यांना येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स क्रीडा सचिव डोमिनिक सॅव्हिओ यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २७, २८ फेब्रुवारी रोजी पाडली.श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा असोसिएशन सदस्य तथा काँग्रेसच्या जिल्हा संयोजिका आशाबाई शिरसाट यांचे क्रीडा क्षेत्रातील प्रभावी कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कारदेखील झालेला आहे. ८ मार्च या जागतिक महिलादिनानिमित्त त्यांना सन २०१६ मध्ये राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल अमरावती महापालिकेतर्फे क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल तत्कालीन महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी पदाधिकाºयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यांना तीन सुवर्णपदकदेखील मिळाले आहेत.आशाबाई यांचा जन्म नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पळसमंडळ येथील शिंदे सावकार घराण्यात झाला. त्यांना शालेय जीवनापासूनच क्रीडाविषयी लळा होता. विद्यार्थी दशेत त्यांनी कैक क्रीडा पुरस्कार मिळविले आहेत. 'लोकमत' सखी मंचतर्फे विदर्भ अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना विवाहानंतर संसाराचा गाडा चालविताना त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या १३ वर्षे पापळ जि.प. सर्कलच्या सदस्य राहिल्यात.शेतीचे काम अद्यापही सुरूआशाबाई शिरसाट यांच्या मालकीचे पळसमंडळ येथे ओलिताचे पाच एकर शेत आहे. त्या स्वत: शेतात राबतात. त्यांचा मुलगा बियाणे कंपनीत जनरल मॅनेजर असल्याने नवनवीन कृषी तंत्रज्ञानाविषयी त्यांना मार्गदर्शन मिळते. सध्या त्यांनी संकरित कोहळ्याची लागवड केली आहे. त्या बियाचा प्रयोग करणाºया त्या जिल्ह्यातील प्रथम शेतकरी महिला होत.